Who Will Become Mayor of Pune: राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी यंदा १५ महानगरपालिका महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही महिला महापौर असेल. यंदा पुणे महानगरपालिवेरही महिलाराज असेल. पुणे महानगर पालिकेसाठी महापौरपद खुला महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. त्यामुळे पुण्याचा महापौर खुल्या प्रवर्गाचा असणार आहे.
नक्की वाचा: Pune News: चुकलं की हुकलं! सोडतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महापौरपदासाठी ट्वीस्ट, मोठी रस्सीखेच
पुणे महापौरपदासाठी कोणाची नावं चर्चेत?
१ रंजना टिळेकर
२ मंजुषा नागपुरे
३ मानसी देशपांडे
४ रोहिणी चिमटे
या चारही महिला पुण्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, पुण्याचे महापौरपद 'खुल्या महिला' प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे या चौघींचीही नावे महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
१. रंजना टिळेकर (Ranjana Tilekar)
भाजपच्या रंजना टिळेकर विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग ४० मधून वसंत मोरे यांच्या मुलाचा रुपेश मोरे यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला आहे. त्या पुण्याच्या अनुभवी नगरसेविकांपैकी एक असून ही त्यांची सहावी टर्म आहे.
२. मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure)
भाजपच्या मंजुषा नागपुरे २०२६ च्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहे. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने मतदानापूर्वीच त्यांचा विजय निश्चित झाला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्या आयटी (IT) क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या सिंहगड रोड परिसरातील लोकप्रिय नेत्या असून, पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
३. मानसी देशपांडे (Mansi Deshpande)
भाजपच्या मानसी देशपांडे या प्रभाग २० (बिबवेवाडी - शंकर महाराज मठ) येथून विजयी झाल्या आहेत. मानसी देशपांडे यांनी या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. बिबवेवाडी परिसरात त्यांचे दांडगे जनसंपर्क असून, प्रभाग समितीच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
४. रोहिणी चिमटे (Rohini Chimte)
भाजपच्या रोहिणी चिमटे या प्रभाग ९ मधून विजयी झाल्या आहेत. त्या भाजपच्या सक्रिय महिला नेत्या असून, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या कोअर टीमचा त्या भाग आहेत.
भाजपने पुण्यातील १६५ जागांपैकी १२० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. आता या अनुभवी महिला नेत्यांपैकी कोणाकडे पुण्याच्या महापौरपदाची वर्णी लागते याकडे सर्वंचं लक्ष आहे.