जाहिरात

Mumbai Mayor Reservation : मुंबईत 'महिलाराज'; सहा जणींपैकी कोणाला मिळणार महापौरांच्या खुर्चीत बसायचा मान?

मुंबई महापौरपदाची जागा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आली असून महिलांसाठी राखीव असेल.

Mumbai Mayor Reservation : मुंबईत 'महिलाराज'; सहा जणींपैकी कोणाला मिळणार महापौरांच्या खुर्चीत बसायचा मान?
मुंबई:

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालानंतर कोण महापौर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. निकाल समोर आल्यानंतर पक्षांनी बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू केली होती. अखेर आज चक्राकार पद्धतीने राज्यातील २९ महापौरपदासाठी सोडत पार पडली. यावेळी मुंबई महानगरपालिकेत महिलाराज असणार आहे. (BMC Mayor Reservation Lottery) मुंबई महापौरपदाची जागा खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आली असून महिलांसाठी राखीव असेल. त्यामुळे कोण मुंबईचा महापौर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे, 

मुंबईचे महापौरपद भाजपला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. महापौरपदासाठीच्या शर्यतीत भाजपच्या 6 नावांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या महिला नगरसेविका कोण आहेत ते पाहूयात. 

1 तेजस्वी घोसाळकर - भाजप  
2 अलका केरकर - भाजप
3 अनुराधा घोडके - भाजप
4 रितू तावडे -  भाजप
5 राजश्री शिरवडकर - भाजप
6 राखी जाधव - भाजप

29 Mayor Lottery: तुमच्या पालिकेत महापौर कोण होणार? सोडत पूर्ण, 29 महापौरांच्या प्रवर्गाची यादी एका क्लिकवर 

नक्की वाचा - 29 Mayor Lottery: तुमच्या पालिकेत महापौर कोण होणार? सोडत पूर्ण, 29 महापौरांच्या प्रवर्गाची यादी एका क्लिकवर 

तेजस्वी घोसाळकर

तेजस्वी घोसाळकर यांनी डिसेंबर २०२५ मध्ये शिवसेना (UBT) सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. त्या दहिसर (प्रभाग क्र. १) मधून यापूर्वीही निवडून आल्या होत्या आणि यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत त्या पुन्हा जिंकून आल्या आहेत. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर त्यांनी काही काळ राजकारणातून विश्रांती घेतली होती. परंतु आता त्या भाजपच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.

अलका केरकर 

अलका केरकर या मुंबईच्या उपमहापौर म्हणून यापूर्वी काम केले आहे. खार-वांद्रे (H-West Ward) परिसरातून त्या निवडून येतात आणि भाजपच्या ज्येष्ठ आणि अनुभवी महिला नेत्यांपैकी एक आहेत.  

रितू तावडे 

रितू तावडे यांनी प्रभाग १३२ मधून २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. घाटकोपर (N Ward) मध्ये त्यांनी राजकीय स्थान बळकट केले असून यापूर्वी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे.

राजश्री शिरवाडकर 

राजश्री शिरवाडकर यांनी प्रभाग १७२ मधून विजय मिळवला आहे. त्यांच्या निवडणुकीवरून शिवसेना (UBT) ने आक्षेप घेतला होता, परंतु त्या बहुमताने विजयी झाल्या आहेत. राजश्री शिरवाडकर यांचेही नाव महापौरपदासाठीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. 

राखी जाधव 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या  राखी जाधव यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या होत्या आणि महापालिकेच्या कामकाजाची त्यांना चांगली जाण आहे. 

अनुराधा घोडके  

अनुराधा घोडके या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्या आणि माजी नगरसेविका आहेत. यामुळे त्यांचेही नाव महापौरपदासाठीच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com