'मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर...', राज यांनी मनातलं सांगितलं

मला मुख्यमंत्र्याची माळ द्या. त्यासाठी मी हापापलेला नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला वाटतं माझं राज्य मोठं झालं पाहीजे. असं राज म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
नाशिक:

विधानसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. बड्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, ठाण्यानंतर आता नाशिकवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नाशिक इथं झालेल्या सभेत राज ठाकरे  यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ते कसा विचार करतात आणि मी कसा विचार करतो याची तुलना त्यांनी जनते समोर ठेवली. शिवाय राज्यात गेल्या पाच वर्षात जे काही झालं त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोपही या सभेत राज ठाकरे यांनी केला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या पाच वर्षात गलिच्छ राजकारण झालं. असं कधीच झालं नव्हतं. त्याची सुरूवात 2019 च्या निकालानंतर झाली. या सर्व गोष्टींना उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. त्यांना अचनाक मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायला लागली. जे कधीच ठरलं नव्हतं. प्रचारातही तसं काही समोर आलं नाही. मात्र निकालानंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्या शिवाय सरकार येत नाही. त्यानंतर त्यांनी अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हे बाहेर काढलं. काही करा पण माझ्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घाला असं उद्धव ठाकरे वागत होते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांनी केली.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO

मी कसा विचार करतो आणि बाकीचे कशा पद्धतीने विचार करतात ते तुम्हाला सांगणार आहे असंही राज म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी स्वत: स्वार्थाचा विचार केला. त्यात जर महाराष्ट्राचं काही हित असतं तर समजू शकलो असतो. पण तसं काही नव्हतं. उद्धव ठाकरेंच्या जागी जर मी असतो तर काय केलं असतं हे ही राज यांनी सांगितलं. मोदींना लोकसभेसाठी पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवाजी पार्कच्या सभेत पाच मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या या महाराष्ट्राच्या हिताच्या होत्या. त्या मागण्या मी माझ्यासाठी केल्या नव्हत्या असंही ते म्हणाले. मोदीं मुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अशा पद्धतीने मी महाराष्ट्र हिताचा विचार करतो असं राज यांनी आवर्जून सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली

मला मुख्यमंत्र्याची माळ द्या. त्यासाठी मी हापापलेला नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला वाटतं माझं राज्य मोठं झालं पाहीजे. शहरं चांगली झाली पाहीजेत. इथल्या तरूणांना तरूणींनी त्यांच्याच शहरात नोकऱ्या मिळाल्या पाहीजेत.  सर्वांचे आयुष्य सुधारले पाहीजे. असा मी विचार करतो असं राज ठाकरे म्हणाले. मी महाराष्ट्राचा नागरीक आहे. मला महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर माझं आहेत. तिथे उद्योग आले पाहीजेत. तिथेच रोजगार मिळाला पाहीजे. याचा विचार मी करतो असं ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे सांगत आहेत प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर बांधणार. पण सध्या गरज आहे ती विद्या मंदीराची. अनेक ठिकाणी शाळा नाहीत. मुलांना शिक्षण मिळत नाहीत. त्यांच्यासाठी विद्यामंदीरं उभं करणं गरजेचं आहे. महाराजांसाठी काय करायचं असेल तर त्यांच्या गड किल्ल्यांकडे लक्ष द्या. पण यांचे डोकं काय आहे ते बघा असं राज यावेळी म्हणाले. मला जर सत्ता दिली तर मी जगात सर्वात मोठं वाचनालय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बांधिन असं राज ठाकरे म्हणाले. तिच खरी बाबासाहेबांसाठी खरी श्रद्धांजली असेल, असं ते म्हणाले. शेवटी तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन त्यांनी केलं.