नाय, नो,नेव्हर! अमित ठाकरेंना पाठिंबा वैगरे काही नाही, आम्ही लढणारच!!

माहीममध्ये तिरंगी लढत होणार असून हा मतदारसंघ लक्ष्यवेधी बनला आहे. भाजपच्या आशिष शेलार यांना अमित ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका करण्यासाठी केलेल्या विधानामुळे शिंदेंच्या शिवसेनेची पंचाईत झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पाटील

ठाकरे कुटुंबातील तरुण पिढीतील दुसरा नेता निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024)  रिंगणात उतरला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाकरे कुटुंबात पहिल्यांदा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे (Amit Thackeray) हे देखील निवडणूक लढवणार आहेत. माहीम मतदारसंघातून त्यांना मनसेने उमेदवारी दिली आहे.  त्यांच्याविरोधात  शिवसेना(उबाठा) पक्षाने महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतर्फे इथून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इथे तिरंगी लढत होणार असून हा मतदारसंघ लक्ष्यवेधी बनला आहे. भाजपच्या आशिष शेलार यांना अमित ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका करण्यासाठी केलेल्या विधानामुळे शिंदेंच्या शिवसेनेची पंचाईत झाली आहे. 

नक्की वाचा: शिवसेना ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, 'या' मुस्लीम उमेदवाराला संधी
 

अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घ्यावी

आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना  म्हटले की, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अमित यांच्याबद्दल नाते वाटत नसेल मात्र महायुतीला मात्र अमित ठाकरेंना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहीजे असे मला वाटते. अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भातील भूमिका घ्यावी अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्याशी मी बोलेन आणि त्यांना विनंती करेन की, राज ठाकरेंचा मुलगा पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर महायुती म्हणून सगळेच समर्थन देऊ, त्याला निवडून देऊ. शेलार यांनी ही भूमिका मांडत असतानाच सदा सरवणकरांच्या उमेदवारीला विरोध नाही असेही म्हटले. 

नक्की वाचा: राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

माघारीचा प्रश्नच नाही

सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना शेलारांच्या या भूमिकेबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की सदा सरवणकर माघार घेणार नाही, ते निवडणूक लढवणारच, आशिष शेलार यांनी जे मत व्यक्त केले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सरवणकर यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला चांगले मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचाच विजय होईल असा विश्वास समाधान यांनी व्यक्त केला.