लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागेचाही समावेश आहे. या जागेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. मात्र आता ही जागा शिवसेना शिंदे गटाल्या सुटण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून शिंदेसेनेचे संदिपान भुमरे यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येथे इम्तियाज जलील विरुद्ध चंद्राकांत खैरे विरुद्ध संदिपान भुमरे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
'तुमच्या पापाचा घडा भरलाय', उन्मेश पाटलांनी गिरीश महाजनांना सुनावलं
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमरे यांच्या उमेदवारीवा ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती मिळत आहे. संदीपान भुमरे २५ एप्रिलला एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरतील, असं देखील बोललं जात आहे.
दुसऱ्या दिवशी 53 अर्जांची विक्री
छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी आज नामकंनाचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी 25 इच्छुकांनी 53 फॉर्म विकत घेतले. त्यापैकी सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. तर सर्वात जास्तं चर्चेत असलेल्या नावांपैकी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यासाठी देखील नामांकन अर्ज खरेदी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर संदिपान भुमरे यांचे सुपुत्र विलास बापू भूमरे यांनी सुद्धा अर्ज घेतले आहेत.
याशिवाय मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि लोकसभेच्या उमेदवारीकरिता चर्चेत असलेल्या नावांपैकी विनोद पाटील यांच्यासाठी सुद्धा अर्ज घेण्यात आले आहे. यासह बहुजन महापार्टी, हिंदुस्तान जनता पार्टी या पक्षाच्या वतीने देखील उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. तर चार उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.
नाशिकचा तिढा वाढला? छगन भुजबळांची मोठी घोषणा, पण टेन्शन वाढवलं
पहिल्या दिवशी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर आज 19 एप्रिल 2024 दुसर्या दिवशी मनिषा उर्फ मंदा खरात, खान एजाज अहमद बिस्मिल्लाह खान, सुरेश आसाराम फुलारे, खाजा कासिम शेख, हर्षवर्धन जाधव, बबनगीर उत्तमगीर गोसावी यांनी आज डीपॉजिट सह अर्ज दाखल केले. अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा नवीन अर्ज दाखल केला. आजच्या दुसर्या दिवशी एकूण 171 अर्जांची विक्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे.