जाहिरात

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?

'सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी आपल्याला अमान्य आहे. त्यामुळे मी बंडखोरी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.'

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?
सांगली:

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली 99 जणांची पहीली यादी जाहीर केली. त्यामुळे अनेक ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे इच्छुक नाराज झाले आहेत. शिवाय ते बंडखोरी करण्याच्या तयारीत ही आहेत. सांगली विधानसभा मतदार संघातही अशीच काहीशी स्थिती आहे. या मतदार संघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजप नेते शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. शिवाय निवडणूक लढणार असा निश्चय केला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपमध्ये बंडखोरी होणार हे जवळपास निश्चित आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 आमदार सुधीर गाडगीळ हे सांगलीचे विद्यमान आमदार आहेत. बंडखोरी होऊ नये. नाराजीचे प्रमाण जास्त वाढू नये यासाठी भाजपने अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारी मुळे नारीजचे सुर उमटत आहेत. सांगली मतदार संघातून शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे हे इच्छुक होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला उमेदवारी देणार असा शब् दिला होता. असा दावा डोंगरे यांनी केला आहे. त्यामुळे शब्द देऊनही आपल्याला डावलले गेल्याचा आरोप डोंगरे यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीच्या चर्चेत नवा ट्विस्ट, काँग्रेसकडून नाना पटोलेंऐवजी 'हा' नेता करणार पवार-ठाकरेंशी चर्चा

यासर्व गोष्टी पाहाता सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात शिवाजी उर्फ पप्पु डोंगरे हे अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली भाजपात बंडखोरी उफळली आहे. गेली 10 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप शिवाजी डोंगरे यांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन उमेदवारी डावलली असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - NCP First List : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 16 उमेदवार ठरले; 'या' नेत्यांना एबी फॉर्म मिळाले

सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी आपल्याला अमान्य आहे. त्यामुळे  मी बंडखोरी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. डोंगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवाय त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षपद ही भूषवलं आहे. आता त्यांनी सांगली विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. माधवनगर येथील बैठकीत शिवाजी डोंगरे यांनी ही घोषणा केली. त्याच बरोबर आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाजी डोंगरे यांच्या बंडखोरीमुळे आता सांगली भाजपाचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Previous Article
महाविकास आघाडीचं घोडं कुठं अडलंय? काँग्रेस- शिवसेना UBT मध्ये कोणत्या जागांवर मतभेद ?
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?
gadchiroli-bjp-mla-dr-devarao-holi-disappointed-over-candidacy-selection
Next Article
पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले