फडणवीस, राज ठाकरे, आंबेडकर हे आतून एक, रोखठोक मधून राऊतांनी ठोकून काढलं

फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे कोणाशी व कोणासाठी लढत आहेत? हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता ऐन रंगात आला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता जेमतेम एक आठवडा प्रचारासाठी शिल्लक आहे. अशा वेळी निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येकानेच जोर लावला आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप, मनसे आणि वंचितवर जोरदार हल्ला चढवत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आपल्या रोखठोक या सदरात फडणवीस, राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांना शब्दाच्या माऱ्याने ठोकून काढले आहे. शिवाय राज आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमीकेबाबतही संशय निर्माण केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 त्यांनी आपल्या रोखठोक या सदरात लिहीले आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांना महाराष्ट्रात घुसू देऊ नका. अशी गर्जना करणारे राज ठाकरे हे आता मोदी व शहांच्या गरब्यात सामील झाले आहेत. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा, म्हणजे मोदी-शहा ठरवतील तोच होईल हे त्यांनी मान्य केले आहे. शिवाय भाजपच्या मदतीसाठी ते बाहेर पडले आहेत. राज ठाकरे यांनी त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना दादर-माहीम विधानसभेतून उभे केले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'मी काय म्हातारा झालोय का? 84 वर्षाचे शरद पवार असं का म्हणाले?

अमित यांच्या विजयासाठी त्यांना भाजपची मदत हवी आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र आपले उमेदवार उभे केले आहेत. अमित ठाकरे हे तरुण आहेत. त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. राजकारणात जास्तीत जास्त चांगल्या तरुणांनी यावे असे सगळ्यांनाच वाटते. प्रश्न इतकाच आहे की, एक जागा जिंकता यावी यासाठी 'मनसे'ने भाजपास इतर सर्वत्र मदत होईल अशी भूमिका घेतली आहे असा आरोप संजय राऊत यांनी या लेखातून केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आक्रीत घडलं! ठाकरे सेनेनं चक्क भाजप उमेदवाराला दिला पाठिंबा? कुठे घडलं?

मुंब्यात शिवरायांचे मंदिर उभारायचे म्हटले तर कोणीच विरोध करणार नाही. लालबागच्या राजासह अनेक गणेश मंडळांचे स्वागत मुंबईतील सर्वच मुस्लिम मोहोल्ल्यांत होत असते. त्यामुळे धार्मिक दंगली घडविण्याचे भाजपचे मनसुबे बाद होत आहेत. 'धर्म हा माणसाच्या रक्षणासाठी आहे, तो त्याचा विध्वंस करण्यासाठी नाही,' अशा आशयाचे जे पत्र त्या काळात छत्रपतींनी औरंगजेबाला पाठविले ते आजही उपलब्ध आहे. फडणवीसांनी ते एकदा समजून घ्यायला हवे.

ट्रेंडिंग बातमी - MVA Manifesto 2024 : मविआने जाहीर केला पंचसूत्री कार्यक्रम; 'महाराष्ट्रनामा'मधील महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

आपल्या कारभारात आणि सैन्यात सर्व धर्मांचे लोक शिवाजी महाराजांनी केले होते.  म्हणूनच ते महाराष्ट्राच्या शत्रूशी लढू शकले. राज ठाकरे असो की प्रकाश आंबेडकर हे मोदी शहांच्या महाराष्ट्र विरोधी राजकारणाबाबत उघडपणे का बोलत नाहीत असा प्रश्न ही राऊत यांनी उपस्थित केला आहे.   फडणवीस, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे कोणाशी व कोणासाठी लढत आहेत? हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या. हे तिघे आतून एक आहेत व त्यांची हातमिळवणी आहे. या भ्रमातून कसे बाहेर पडायचे? असा प्रश्नही संजय राऊत यांनी या लेखाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

Advertisement