गुरुप्रसाद दळवी
Shraddha Raje Bhosale: कोकणातील ऐतिहासिक संस्थान म्हणून सावंतवाडी संस्थानची ओळख आहे. या संस्थानच्या खेमसावंत भोसले घराण्याच्या सुनबाई श्रद्धाराजे भोसले निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. भाजपने त्यांना सावंतवाडी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. सावंतवाडीत या राजघराण्याने नेहमीच अध्यात्मक, कला आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. मात्र पहिल्यांदाच हे राज घराणे राजकारणात उतरले आहे. नुसते राजकारणात नाही तर निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असे चित्र आहे.
सावंतवाडी संस्थानच्या सावंत भोसले राजघराण्यातील खेम सावंत दुसरे यांनी इसवी सन 1692 मध्ये सुंदरवाडी येथे आपली राजधानी स्थापन केली. तत्पूर्वी सावंत भोसले राजघराणे हे मूळ राजस्थान मधील क्षत्रिय कुळातील आहेत. महाराष्ट्रातील दख्खन आणि कोकण प्रांतात या घराण्यातील सरदारांनी आगेकूच केली. त्यानंतर सावंतवाडी संस्थांच्या राजगादीची स्थापना 1627 मध्ये खेम सावंत यांनी केली. त्यांच्या शौर्याची दखल घेत विजापूरच्या बादशहाने त्यांना देशमुखीची सनद दिली.
या संधीच्या जोरावर आणि आपल्या पराक्रमाच्या बळावर त्यांनी सावंतवाडी परिसरात आपली सत्ता प्रस्थापित केली. खेम सावंत यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. खेम सावंत यांची सत्ता प्रबळ होऊन त्यांनी राज्यकारभार करताना सावंतवाडीचा विकास केला. पर्यटन, शिक्षण आणि व्यापार याच्या माध्यमातून खेम सावंत यांनी सावंतवाडीचे महत्व जगाला पटवून दिले. याच काळामध्ये खेम सावंत कुटुंबाकडून राजकीय क्षेत्रातील आपले पाऊल टाकले. खेम सावंत बापूसाहेब महाराज, राजमाता पार्वतीदेवी राजेसाहेब, शिवराम राजे राजेसाहेब, खेम सावंत 6वे, राजमाता सत्वशीला देवी भोसले यांनी राजकीय क्षेत्रात कार्य केले. आता या राजघराण्याच्या सुनबाई श्रद्धाराजे लखम भोसले निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
श्रद्धाराजे भोसले या उच्चशिक्षित आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. तर शिक्षण अमेरिकेमध्ये झाले आहे. श्रद्धाराजे या गुजरातमधील क्षत्रिय समाजाच्या आहेत. त्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. विशेष म्हणजे सावंतवाडीत राहून ही श्रद्धाराजे भोसले यांना मराठी बोलता येत नाही. त्यामुळे हा विषय कोकणात सध्या चर्चेचा बनला आहे. त्यांचे व्हिडिओ ही प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांनी मीडियाला मुलाखत देताना मोडकतोडक मराठी बोलण्याचा प्रयत्न केलाय. श्रद्धाराजे भोसले या मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले. त्यांचा विवाह 2019 ला सावंतवाडी राज घराण्यातील तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झाला.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने श्रद्धाराजे भोसले यांना नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे. शिंदे शिवसेनेच्या नीता कविटकर आणि ठाकरे सेनेच्या सीमा मटकर यांची श्रद्धाराजे भोसले यांच्याशी कडवी लढत असेल. तसेच काँग्रेसकडून साक्षी वंजारी आणि भाजप बंडखोर उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर याही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे श्रद्धाराजे भोसले यांना वाटते तशी ही निवडणूक सोपी नाही. एकंदरीत सावंतवाडी नगरपरिषदसाठी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सेना, भाजप, काँग्रेस, ठाकरे सेना यांच्या खरी चुरस पाहायला मिळणार आहे. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world