पवार कुटुंबाचा पाडवा आणि बारामती हे एक समिकरण बनलं आहे. पवार कुटुंब पाडल्या एकत्र येत ही अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र ही परंपरा यावर्षी मात्र खंडीत झाली. शरद पवारांनी गोविंद बागेत तर अजित पवारांनी काटेवाडीत पाडवा साजरा केला. आधी कुटुबात फूट नंतर सणातही फूट बारामतीकरांनी पाहीली. मात्र यावर बोलताना अजित पवार का आले नाहीत याचे थेट कारण शरद पवारांनी दिले. शिवाय पाडव्याला गोविंद बागेत पवार कुटुंबातले कोण कोण सदस्य उपस्थित होते याची लिस्टच सांगितली. शिवाय अजित पवारांच्या कुटुंबातलं कोण आलं होतं याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनेक वर्षांची परंपरा आहे. पवार कुटुंबं पाडव्याचा सण एकत्र येऊन साजरा करतो. आम्ही सगळेजण एकत्र जमतो. हीच परंपरा होती. ती कायम राहीली असती तर आनंद झाला असता असे यावेळी शरद पवार म्हणाले. पण या वेळी दोन ठिकाणी पाडवा झाला. त्याला काही करू शकत नाही. लोकांना मात्र दोन ठिकाणी जावं लागलं. लोकांना याचा खूप त्रास झाला. यामुळे मी अस्वस्थ आहे असे ही शरद पवारांनी या निमित्ताने स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अजित पवार मात्र या पाडव्यावा पवार कुटुंबा सोबत का आले नाहीत असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर अजित दादांना काही कामामुळे कदाचित वेळ मिळाला नसेल, त्यामुळे ते आले नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र पवार कुटुंबातील अन्य सर्व सदस्य आले होते. अजित पवारांचे भाऊ ही उपस्थित होते. त्यांच्या बहीणीही आल्या होत्या असेही त्यांनी सांगितले. या शिवाय राज्यभरातूनही मोठ्या प्रमाणात लोक आले होते. त्यांच्या भेटी झाल्या. नेहमी पेक्षा जास्त लोक आले होते. त्याचा आनंद आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बारामतीत पवार कुटुंबाचा एकत्रीत पाडवा होता. ही परंपरा मात्र या वर्षी खंडीत झाली. पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे झाले आहेत. त्याता आता निवडणुका होत आहेत. अशा वेळी या दोघांनीही एकत्र येणे टाळले आहे. जर हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असता. त्यामुळे या दोघांनीही एकत्र येणं टाळलं असावं का असा ही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.