जाहिरात
Story ProgressBack

भाजप कोट्यातील एका जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा? विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली

येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी (Legislative Council elections) मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे.

Read Time: 2 mins
भाजप कोट्यातील एका जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा? विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी (Legislative Council elections) मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. 

दरम्यान याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेत भाजपाकडून शिवसेनाला एक जागा जास्त हवी आहे. भाजपा कोट्यातील विधान परिषदेच्या एका जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. विधानसभा संख्येनुसार भाजपा पाचा जागा लढवू इच्छितो. तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी अजित पवार प्रत्येकी दोन जागा, असं गणित ठरवलं आहे. पण आता शिवसेनेने दिल्लीत भाजप नेत्याकडे एक जागा त्यांच्या कोट्यातील मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसाार एकनाथ शिंदे शिवसेनेने विधान परिषद जागा लढवण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी भाजपा दिल्लीत नेत्यांसोबत चर्चा केल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली भाजपा नेत्या सोबत संवाद करून भाजपा कोट्यातून एक जागा मिळावी अशी  अपेक्षा व्यक्त केली. याबाबत भाजपाने मात् अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही.

नक्की वाचा - विधान भवनाचे दरवाजे आता सर्वसामान्यांसाठी बंद, आता दोन दिवसच प्रवेश मिळणार, कारण काय?

2 जुलै रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?
25 जून - अधिसूचना जारी
2 जुलै - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
3 जुलै - अर्ज छाणणी
5 जुलै - अर्ज मागे घेण्याची तारीख
12 जुलै - मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
12 जुलै - मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता)
 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Maharashtra Legislative Council Results : विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज निकाल
भाजप कोट्यातील एका जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा? विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली
maharashtra-legislative-council-election-results-2024-anil parab j-mo-abhyankar win shivsena ubt
Next Article
विधानपरिषद निवडणूक निकाल : मुंबईत उबाठाची सरशी, परब, अभ्यंकर विजयी
;