"निवडणूक आयोग भाजपची चमचेगिरी करणारा आयोग", अंबादास दानवेंचं टीकास्त्र

अंबादास दानवे यांनी म्हटलं की, आम्ही आता हे गाणं आमच्या फेसबुक आणि ट्विटरवर जोरात वाजवणार आहोत.

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग भाजपची चमचेगिरी करणारा आयोग आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलं. 

निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीताच्या टीझरमधील तुळजाभवानी आणि हिंदू हा शब्द वगळण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अंबादास दानवे यांनी म्हटलं की, आम्ही आता हे गाणं आमच्या फेसबुक आणि ट्विटरवर जोरात वाजवणार आहोत. सभेमध्ये वाजणार आहोत, त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी हे गाणं मोठ्या जोरात वाजवलं जाणार आहे, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा - 'जय भवानी' वरून निवडणूक आयोग अडले, ठाकरे थेट नडले, वाद पेटणार?)

एकीकडे पाहिलं तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत. सभेमध्ये आम्हाला मतदान करा, आम्हाला पुन्हा निवडून द्या. आम्ही तुम्हाला आयोध्येचे मोफत दर्शन देऊ, अशा घोषणा करत आहेत. मात्र निवडणूक आयोग फक्त विरोधी पक्षांकडेच पाहत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा चमचेगिरी करणार आयोग झाला आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

(नक्की वाचा - आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?)

मोदी-शाहांवर कारवाई करा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली आहे. कारवाई करायची असेल तर आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर करून दाखवावी. मोदींनी कर्नाटकच्या निवडणुकीत जय बजरंगबली अशी घोषणा दिली होती. तर अमित शाहांनी तर मध्य प्रदेशमध्ये रामाचं मोफत दर्शन घडवू असं आश्वासन दिलं होतं. त्यांच्यावर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

Advertisement