जाहिरात
Story ProgressBack

आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?

Read Time: 3 min
आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?
अमरावती:

वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकाश आंबेडकरांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. हा निर्णय रिपब्लिकन सेनेमुळे घेण्यात आल्याचे समोर आले आहे. अमरावती लोकसभेत ही फुट पडली आहे. इथल्या जिल्ह्यातील वंचितच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या मतदार संघात काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे. तशी घोषणा वंचित अमरावती जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता गवई यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वंचितमध्ये फूट का पडली? 

अमरावती जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी अमरावती लोकसभेत   काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा घोषित केलेला आहे. अमरावती लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर हे रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. मात्र रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत असा आरोप आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मतामुळे त्याचा फायदा भाजपाला होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे गवई यांनी जाहीर केले. काँग्रेस उमेदवाराचा  प्रचार करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे शैलेश गवई यांनी सांगितले.. जिल्ह्यातील सर्वच तालुका अध्यक्ष आपल्या सोबत असल्याचा दावा शैलेश गवई यांनी केलेला आहे. 

हेही वाचा - महायुती ठाकरे गटाचा गड भेदणार?; परभणीत संजय जाधव-महादेव जानकरांमध्ये लढत

प्रकाश आंबेडकरांना धक्का 

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी आनंदराज आंबेडकर यांना या मतदार संघात पाठिंबा दिला होता. मात्र वंचितच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर या फुटीवर काय उपाय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र वंचितने दिलेल्या पाठिंब्या मुळे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडेंचे बळ वाढणार आहे हे निश्चित आहे.

काँग्रेसचं बळ वाढणार? राणांना टेन्शन 

वंचितच्या संपुर्ण अमरावती युनिटनं काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंच्या बाहूमध्ये नक्कीच बळ भरलं आहे. वंचितची मोठी ताकद अमरावतीत आहे. त्याचा फायदा काँग्रेस उमेदवाराला होऊ शकतो. यामुळे मात्र भाजप उमेदवार नवनीत राणा यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. ज्या मतांती विभागणी होणार होती ती जर एकगठ्ठा काँग्रेसच्या पारड्यात पडणार असतील तर राणा यांची संसदे पर्यंतची वाट बिकट होणार आहे अशी चर्चा रंगू लागली आहे. 

अमरावतीत होत आहे तिरंगी लढत 

अमरावती लोकसभेत तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसने आमदार बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यांच्यासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर या जोरदार प्रचार करत आहेत. तर भाजपने नवनीत राणा यांच्यावर डाव खेळला आहे. यामध्ये बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेस भाजप आणि प्रहार मध्ये तिरंगी लढत होत आहे. ही लढत अटीतटीची होणार अशी स्थिती आहे.

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination