मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारीनंतर उज्ज्वल निकम यांनी जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे. आज प्रचारादरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि महायुतीचे कार्येकर्ते यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, खार परिसरात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची रॅली खार परिसरातून निघाली होती. भाजपची रॅली वाटेत ठाकरे गटाच्या शाखेबाहेर येऊन थांबली.
नक्की वाचा- भिवंडीत निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेबाहेर येताच भाजप कार्यकर्त्यांनी 'आपकी बार 400 पार'चा नारा देत डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाकडून देखील 'अबकी बार मोदी सरकार तडीपार' असा नारा देण्यात आला. यावरून दोन्ही गटांमध्ये राडा झाला.
(नक्की वाचा - 'विश्वजीत कदम वाघच,संधी बघून वाघ झडप घालतो')
व्हिडीओत दिसतंय त्यावरून दोन्ही बाजून कार्यकर्ते काही वेळ आक्रमक झालेला पाहायला मिळाले. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर देखील धावून जात होते. मात्र पोलिसांना परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेत मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्तांना नियंत्रणात आणलं.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपकडून उज्ज्वल निकम तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात आहे.