रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Municipal Corporation Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर हळूहळू राज्यभरातील उमेदवारांच्या नावांची यादी समोर येत आहे. मनसेसाठी महत्त्वाची महानगरपालिका असलेल्या ठाण्यातून मनसेच्या उमेदवारांची नावं समोर आली आहेत.
महाविकास आघाडीमध्ये जागेचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही. मात्र दुसरीकडे मनसेने काल रात्री 24 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेकडून काल रात्री उशिरा मनसेचे नैनेश पाटणकर - ठाणे पालघर जिल्हा सचिव यांच्याकडून उमेदवारांना एबी फॉर्मच वाटप करण्यात आलं.
ठाण्यात ठाकरे बँड निवडणुकीच्या रिंगणात..
मनसे कडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून आतापर्यंत २४ इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मच वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.
ठाण्यात मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
रवींद्र मोरे - प्रभाग क्रमांक २,
निलेश चव्हाण- प्रभाग क्रमांक ३
पुष्कर विचारे - प्रभाग क्रमांक ५
सचिन कुरेल- प्रभाग क्रमांक ८
सविता मनोहर चव्हाण - प्रभाग क्रमांक २०
संगीता जोशी - प्रभाग क्रमांक २१
रश्मी सावंत - प्रभाग क्रमांक १६
यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (एकसंध) शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते. या निवडणुकीत शिवसेनेने ६७ जागा जिंकल्या होत्या. तर अखंड राष्ट्रवादीने ३४ जागा जिंकल्या गोत्या. भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
