लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत 240 जागा मिळाल्या आहेत. ते पूर्ण बहुमताच्या आकड्यापासून 32 जागांनी मागे आहेत. त्यांना सत्तास्थापना करायची असेल तर एनडीएचे घटक पक्ष टीडीपी आणि जेडीयूवर अवलंबून राहावं लागेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आपल्या घटक पक्षांशी संपर्क साधत आहे. चंद्रबाबू नायडू यांनी भाजपला समर्थन देण्यासाठी आपला पक्ष टीडीपीकडून लोकसभा अध्यक्ष आणि आपल्या तीन खासदारांच्या एका मंत्रिपदाची मागणी करू शकतात.
5 मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष पदाची नायडूंना अपेक्षा...
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, चंद्रबाबू नायडूंच्या पक्षाने या निवडणुकीत एकूण 16 जागा जिंकल्या आहेत. नायडू तीन खासदारांच्यामागे एक मंत्रिपदाची मागणी करीत आहेत. जर हे शक्य झालं तर नव्या सरकारमध्ये त्यांचे पाच केंद्रीय मंत्री होऊ शकतात. सोबतच चंद्राबाबू नायडूने आपल्या पक्षासाठी लोकसभा अध्यक्षाच्या पदाची मागणी करू शकतात. अद्याप या बातम्यांबाबत कोणाकडूनही अधिकृत माहिती आलेली नाही.
नक्की वाचा - 'पिक्चर अभी बाकी है'! दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, सत्तेसाठी रस्सीखेच सुरू
नितीश कुमारही पोहोचली दिल्लीला...
एनडीएचं सरकार आलं तर यात टीडीपीसह नितीश कुमार यांच्या जेडीयूची भूमिका महत्त्वपूर्ण राहिल. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतरपासून जेडीयू आणि टीडीपी कोणासोबत जाणार, याबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. दरम्यान सत्तास्थापनेच्या सर्व समीकरणांवर चर्चा करण्यासाछी एनडीएने आपल्या घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सामील होण्यासाठी नितीश कुमार दिल्लीला पोहोचले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world