जाहिरात

'गुंडाफुंडांच्या ताब्यात कोकण द्यायचं आहे का?' ठाकरे तळकोकणात गरजले

लोकसभेला नको तो माणून तुम्ही तुमच्या डोक्यावर पुन्हा का बसवून घेतला. या कोकणात पहिले दहशत होती. भयाण वातावरण होतं. हे तुम्ही विसरलात का?

'गुंडाफुंडांच्या ताब्यात कोकण द्यायचं आहे का?' ठाकरे तळकोकणात गरजले
सावंतवाडी:

लोकसभेला थोडी गडबड झाली. पण विधानसभेला अशी गडबड होवू देवू नका. कोकण आणि शिवसेनेचे एक वेगळं नात आहे. त्यात काहींनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आता जागे व्हा. हे कोकण तुम्हाला गुंडाफुंडाच्या ताब्यात द्यायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडीत राणे आणि केसरकरांना लक्ष केलं. काही लोकांची वकवक थांबत नाही. त्यांना वठणीवर आणा असे आवाहन यावेळी ठाकरेंनी केलं. दिपक केसरकर हे खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहेत. आधी ते सज्जन वाटले होते. पण ते तसे नाहीत. मनी नाय भाव आणि देवा मला पाव अशी त्यांची अवस्था आहे असा टोला त्यांनी लगावला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा पैसे खाऊन बसवला होता असा आरोप ठाकरे यांनी केला. लोकसभेला हा पुतळा बसवण्यात आला. त्यामुळे तुम्ही भूलला असाल. पण आता तसं करू नका. हे महाराजांचे भक्त नाहीत. तर हे डाकू दरोडेखोर आहेत. मुख्यमंत्री म्हणतात हा पुतळा वाऱ्याने पडला. असं बोलायला त्यांना लाज वाटली नाही का? असं ठाकरे म्हणाले. शिवाय वायटातून काही तरी चांगलं होईल असं इतले आमदार दिपक केसरकर म्हणाले. असं वक्तव्य करण म्हणजे दुर्बुद्धी असल्याचे ते म्हणाले. त्यांचा मेंदू आहे की कचरा असा हल्लाबोल ठाकरे यांनी केसरकरांवर केला. ज्यावेळी केसरकरांना पाडणार त्याच वेळी कोकणाचं चागलं होणार असंही ते यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'उभं करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला नाही' विखेंच्या गडात पवारांची फटकेबाजी

सावंतवाडीत चांगलं हॉस्पिटल उभारण्याची जाबादारी मी घेतो. सरकार येताच हा निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. सरकरा येणार म्हणजे येणारच असंही ते यावेळी म्हणाले. शिवाय मुंबईत गिरणी कामगारांना घरं देणार असल्याचंही ते म्हणाले. शेतकरी सध्या त्रस्त आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आता सरकारला पान्हा फुटला आहे. पण आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार असल्याचे उद्धव यावेळी म्हणाले. लोकसभेला फटका बसल्यानंतर आताचं सरकार निर्णय घेत आहे, असा आरोपही यावेळी ठाकरे यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा

लोकसभेला नको तो माणून तुम्ही तुमच्या डोक्यावर पुन्हा का बसवून घेतला. या कोकणात पहिले दहशत होती. भयाण वातावरण होतं. हे तुम्ही विसरलात का? कोकण पुन्हा भरारी घेईल असा विश्वास आहे. त्यामुळे हा कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचा का याचा विचार करा. सध्याची स्थिती बघवत नाही असंही ठाकरे यावेळी म्हणाले. केसरकर, राणे यांचे नाव न घेता हे शिवद्रोही आहेत. हे महाराष्ट्र द्रोही आहेत असे ठाकरे म्हणाले. पुतळा कोसळला त्यावेळी मविआचे नेते किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी याच लोकांनी ठणाणणा केला असं ते म्हणाले. दरम्यान बंडखोरांनाही उद्धव यांनी यावेळी ठणकावले आहे. बंडखोरी करणं म्हणजे ही महाराष्ट्र द्रोह आहे असंही ते म्हणाले. अजूनही वेळ गेली नाही बरोबर या असं आवाहन ठाकरेंनी केलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com