विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेकांचे सुर बदलले आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. त्या उमेदवाराचा पराभवही केला. पण निकाल लागल्यानंतर तोच नेत आता मी कालही अजित दादांसोबत होतो आणि आजही अजित दादा सोबतच आहे असं वक्तव्य केले आहे. हे घडलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. निवडणुकीच्या तोंडावर उमेश पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडली होती. त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराची प्रचारही केला. त्याचा विजयही झाला. मात्र त्यानंतर उमेश पाटील यांनी युटर्न मारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोहोळ विधानसभेत उमेदवारी कोणाला द्यायची यावरून उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यात वाद झाला होता. उमेश पाटील यांनी राजन पाटील यांनी सुचवलेल्या यशवंत माने यांना उमेदवारी देवू नये असा आग्रह धरला होता. मात्र अजित पवारांनी उमेश पाटील यांचे ऐकले नाही. त्यांनी यशवंत माने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उमेश पाटील हे नाराज झाले होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. निवडणुकीत शरद पवारांच्या उमेदवाराचा प्रचार केला.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं
निवडणूक निकालानंतर अजित पवारांच्या यशवंत माने यांचा पराभव झाला. राजू खरे हे विजयी झाले. त्यानंतर उमेश पाटील यांनी हा विजय मोहोळच्या जनतेचा असल्याचे म्हटले आहे. माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यात वाद आहे. त्यामुळे राजन पाटील यांनी सुचवलेल्या उमेदवाराला त्यांनी विरोध केला होता. राजू खरे यांचा विजय हा मोहोळ तालुक्यातील स्वातंत्र्यचा आहे असं उमेश पाटील म्हणाले. विजय जरी शरद पवारांच्या उमेदवाराचा झाला असला तरी मी कालही अजित दादांसोबत होतो आणि आजही अजित दादा सोबतच आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
अजित पवारांना त्यावेळेस सांगत होतो. राजन पाटील यांच्या उमेदवारांचा पराभव होणार आहे. शेवटी यशवंत माने यांचा पराभव झाले. पराभवानंतर अजित पवारांनी फोन केला होता. त्यावेळेस मी त्यांना सांगितले राजन पाटलांच्या नादी लागू नका त्याच्या विरोधात रोष आहे. जर त्यावेळेस राजन पाटील तुतारीकडे किंवा इतर पक्षात गेले असते. तर आज घड्याळाचा आमदार मोहोळ मधून आला असता असे उमेश पाटील म्हणाले. आम्हाला राजन पाटलाच्या विरोधातला आमदार निवडून आणायचा होता. मोहोळ मतदार संघात कोणताही पॅटर्न नव्हता. अन्याय अत्याचाराविरोधात लढाई होती ती आम्ही जिंकली असं ही ते म्हणाले.