देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे थेट काँग्रेस कार्यालयाकडे निघाले, धनंजय मुंडेंनी आवाज दिला अन्...

पंकजा मुंडे यांचा अर्ज भरण्याआधी एक गमतीशीर किस्सा घडला. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस रस्ता चुकल्याचं दिसून आलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व 12 उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखले केले. भाजकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर यांनी अर्ज भरला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंकजा मुंडे यांचा अर्ज भरण्याआधी एक गमतीशीर किस्सा घडला. अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस रस्ता चुकल्याचं दिसून आलं. निवडणूक कार्यालयात जाण्याऐवजी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस काँग्रेस कार्यालयाकडे गेले. 

धनंजय मुंडे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आल्याने त्यांनी त्यांना हाक मारली. त्यानंतर पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांना चूक समजली आणि पुन्हा दोघेही निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहोचले. 

(नक्की वाचा- विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचं टेन्शन वाढलं, मिलिंद नार्वेकरांकडून अर्ज दाखल)

ठाकरे गट आणि भाजप नेते एकाचवेळी दाखल

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचा अर्ज भरतेवेळी मिलिंद नार्वेकर हे देखील निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन नेते देखील त्यावेळी आत उपस्थित होते. दोन्ही मंत्री गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते आतमध्ये गेले. 

Advertisement

विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट

ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी देखील निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक अटळ आहे. मिलिंद नार्वेकर निवडणुकीत उतरलेल्याने कुणाची मते फुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

(नक्की वाचा- राहुल गांधींच्या भाषणातील मोठा भाग हटवला, आजही संसदेत पुन्हा खडाजंगीची शक्यता)

विधानपरिषदेसाठीचे उमेदवार

भाजप

  • सदाभाऊ खोत
  • परिणय फुके
  • पंकजा मुंडे
  • अमित गोरखे
  • योगेश टिळक

काँग्रेस

  • प्रज्ञा सातव

शिवसेना ठाकरे गट

  • मिलिंद नार्वेकर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट

  • जयंत पाटील (शेकाप)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

  • शिवाजी गर्जे
  • राजेश विटेकर

शिवसेना

  • भावना गवळी
  • कृपाल तुमाने
Topics mentioned in this article