लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी थेट सांगितलं

लाडक्या बहिणींनी विरोधकांना शिल्लक ठेवलं नाही. मी सांगत होतो की आम्ही थंम्पिंग मेजॉरीटीने येवू पण त्यांनी विरोधकांना डंम्पिंगमध्ये पाठवलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणी जमल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबोधित करताना लाडक्या बहिणांची आभार मानले. शिवाय हा लाडका भाऊ तुमच्या मागे खंबिर पणे उभा असल्याचेही त्यांनी सांगितलं. लाडक्या बहिणींनी विरोधकांना शिल्लक ठेवलं नाही. मी सांगत होतो की आम्ही थंम्पिंग मेजॉरीटीने येवू पण त्यांनी विरोधकांना डंम्पिंगमध्ये पाठवलं असंही ते यावेळी आवर्जून म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वर्षा बंगल्यावर महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही सुपरहीट झाली. या लाडक्या बहिणींमुळे महायुतीला मोठा विजय मिळाला. विरोधकांचा सुपडा साफ झाला. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतके ही संख्याबळ राहीले नाही असं ही शिंदे यावेळी म्हणाले. त्यांना तुम्ही साफ धुवून टाकलं. येवढं मतदान केलं येवढं मतदान केलं की लाडक्या बहिणांची लाट निर्माण झाली असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं

निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिण योजनेचे पैसे वाढवणार असल्याचे आश्वासनही दिले होते. शिवाय निवडणुकी पुर्वी महिलांच्या खात्यात पैसेही जमा केले होते. निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बहिणींना आधी 1500 रूपये दिले आहेत. त्याचे आता 2100 ठरल्या प्रमाणे लवकरच देणार आहोत. काळजी करू नका असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे 2100 रूपये देण्याचा निर्णय महायुतीचे सरकार लवकरच घेईल असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?

तुम्ही तुमच्या लाडक्या भावांसाठी मतदान केलं. ते यशस्वी झाले. या निवडणुकीत बहिणींची लाट नाही तर त्सुनामी आली. त्यात विरोधक वाहून गेले. सर्वच जण मला किती जागा मिळणार असे नेहमी सांगत होते. मी त्यांना थंम्पिंग मेजॉरिटी मिळणार असे सांगत होतो. पण बहिणींनी कमाल केली त्यांनी विरोधकांना डंम्पिंगचा रस्ता दाखवला. त्यामुळे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यावाद थोडे आहेत. वर्षा बंगल्या बाहेर मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केली होती. त्यावेळी विजय उत्सव साजरा करण्यात आला. महिलांनी फुगड्याही घातल्या.  

Advertisement