जाहिरात

BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण होणार? कोणत्या पक्षात OBC, SC, ST आरक्षणाचे किती नगरसेवक?

आज २९ महानगरपालिकांतील महापौरपदाची सोडत आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे.

BMC Election 2026 : मुंबईचा महापौर कोण होणार? कोणत्या पक्षात OBC, SC, ST आरक्षणाचे किती नगरसेवक?

Mayoral lottery 2026 : आज २९ महानगरपालिकांतील महापौरपदाची सोडत आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौरपद आरक्षित आहे की खुले हे स्पष्ट होईल. दरम्यान राज्यातील श्रीमंत महानगरपालिका मुंबईत कुठल्या आरक्षणाचे किती नगरसेवक आहेत?

सोडतीत आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपद कुणाला द्यायचं यासाठी हालचालींना वेग येईल. आज २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. कारण आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावरुन नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. 

KDMC Election: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, सत्तेची समीकरणे काय?

नक्की वाचा - KDMC Election: कल्याण डोंबिवलीत मोठा ट्वीस्ट! मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, सत्तेची समीकरणे काय?

प्रवर्गानुसार पक्षांचे नगरसेवक 

भाजप 
खुला - ३१
महिला - २५
ओबीसी - १७
ओबीसी महिला - १३ 
एससी - २
एससी महिला - १ 
एसटी - ०
एसटी महिला - ०

शिंदे गट 
खुला - ११
महिला - ९
ओबीसी - ३
ओबीसी महिला - ३
एससी - १
एससी महिला - २
एसटी - ०
एसटी महिला - ०

ठाकरे गट 
खुला - २०
महिला - १८
ओबीसी - ११
ओबीसी महिला - ७ 
एससी - ३
एससी महिला - ४
एसटी - १
एसटी महिला - १

मनसे 
खुला - १
महिला - ४
ओबीसी - ०
ओबीसी महिला - १
एससी - ०
एससी महिला - ०
एसटी - ०
एसटी महिला - ०

काँग्रेस 
खुला - ८
महिला - ९
ओबीसी - २
ओबीसी महिला - ४
एससी - ०
एससी महिला - १ 
एसटी - ०
एसटी महिला - ०

एमआयएम 
खुला - १
महिला - ३
ओबीसी - ३
ओबीसी महिला - ० 
एससी - १
एससी महिला - ०
एसटी - ०
एसटी महिला - ०

गेल्या काही वर्षात कोणत्या प्रवर्गाचे महापौर होते?

२००० - सर्वसाधारण - हरेश्वर पाटील
२००२ - एससी - महादेव देवळे
२००५ - ओबीसी महिला - डॉ. शुभा राऊळ
२००९ - सर्वसाधारण महिला - श्रद्धा जाधव
२०१२ - सर्वसाधारण - सुनील प्रभू
२०१४ - एससी महिला - स्नेहल आंबेकर 
२०१७ - सर्वसाधारण - विश्वनाथ महाडेश्वर 
२०२० - सर्वसाधारण - किशोरी पेडणेकर 


(महत्त्वाचं - खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून आलेल्या आरक्षित प्रवर्गातील सदस्यदेखील महापौरपदाची निवडणूक लढवू शकतो. मात्र यासाठी सदस्याकडे जातीचं वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com