जाहिरात

18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा

Bollywood News: फना सिनेमामध्ये आमीर खानच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारसोबत आम्ही तुमची भेट घडवणार आहोत. 18 वर्षांनंतर हा बालकलाकार कसा दिसतोय? पाहा फोटो....  

18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा

Bollywood News: हिंदी सिनेसृष्टीतील एका क्युट बालकलाकारासोबत आम्ही तुमची भेट घडवणार आहोत. या बालकलाकाराने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानपासून ते सलमान खानपर्यंत अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. या मुलाचा निरागस चेहरा पाहून आपण कोणाबद्दल चर्चा करत आहोत, हे तुम्हाला समजलेच असेल. 'फना' सिनेमामध्ये या बालकलाकाराने काजोल आणि आमीरचा मुलगा रेहानची भूमिका साकारली होती. या बालकलाकाराचे नाव 'अली हाजी' (Ali Haji) असे आहे.

वर्ष 2006मध्ये गाजलेल्या 'फना' (Fanaa Movie) सिनेमामध्ये अलीला (Ali Haji) काजोल (Kajol) आणि आमीरसारख्या (Aamir Khan) बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. यानंतर वर्ष 2007मध्ये अली बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत 'पार्टनर' सिनेमामध्ये तो झळकला होता. बालकलाकार म्हणून अलीने मालिका तसेच सिनेमांमध्येही अप्रतिम काम केले आहे. निरागसपणा आणि दमदार अभिनयाने त्याने सिनेरसिकांचे मन जिंकले. विशेष म्हणजे मोठ्या पडद्यावर या सुपरस्टार्ससोबत त्याची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळाली.  

सिनेसृष्टीतील अली हाजीचे करिअर 

अली हाजीने 100 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. वर्ष 2006मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'फॅमिली' सिनेमाद्वारे अलीने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या भूमिका साकारली होती. पण या सिनेमासाठी त्याला क्रेडिट देण्यात आले नव्हते. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'नोबेलमॅन' या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वर्ष 2019 मध्ये हृतिक रोशनच्या 'सुपर 30' सिनेमामध्ये अली सपोर्टिंग रोलमध्ये दिसला होता. सध्या तो सिनेसृष्टीत सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आपले नशीब आजमावत आहे.

दिग्दर्शनाचीही पार पडली जबाबदारी

24 वर्षांच्या अलीने केवळ अभिनयच नव्हे तर सिनेसृष्टीमध्ये दिग्दर्शनाचीही जबाबदारी पार पाडली आहे. 'बॉम्बे ब्लिट्ज', 'नैना दा क्या कसूर', '#Goals' यासारख्या काही शॉर्ट फिल्म्सचे त्याने दिग्दर्शन केले आहे. याव्यतिरिक्त गायक मीका सिंगचे गाणे 'छोरी' आणि जस्टिस फॉर गुड कॉन्टेंट #Justiceforgoodcontent नावाच्या एका फीचर सिनेमाचेही त्याने दिग्दर्शन केले आहे. 

आणखी वाचा

EXCLUSIVE : 'आम्हाला कसलीही भीती नाही, मृत्यू...' CM शिंदेंच्या भेटीनंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर

'या' नायिकने केलंय 12 वी मध्ये टॉप, IAS ऑफिसर होता-होता झाली हिरोईन!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...
18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा
riteish deshmukh ndtv marathi promo launched and special interview in marathi
Next Article
सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी