जाहिरात

Uttar Movie: उत्तर सिनेमासाठी अभिनय बेर्डेनं तब्बल 12 Kg वजन घटवलं, प्रेक्षकांना खूप आवडला नन्या

Uttar Movie: अभिनय बेर्डे सध्या उत्तर सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.

Uttar Movie: उत्तर सिनेमासाठी अभिनय बेर्डेनं तब्बल 12 Kg वजन घटवलं, प्रेक्षकांना खूप आवडला नन्या
"Abhinay Berde: अभिनय बेर्डेनं सिनेमासाठी वजन घटवलं"
Uttar Movie

Abhinay Berde | Uttar Movie: उत्तर सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून संपूर्ण टीम विविध चित्रपटगृहांना भेट देत आहे, तिथे मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अक्षरशः भारावून टाकणारा आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षक कलाकारांशी संवाद साधत आहेत. विशेषतः अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय. प्रेक्षक अभिनयला गराडा घालत आहेत, त्याची स्तुती करत आहेत. महिला त्याला भेटताना-बोलताना भावुक होऊन रडत असल्याचंही पाहायला मिळत आहे. प्रेक्षक अभिनयला (Abhinay Berde Weight Loss News) आपल्याच घरातला मुलगा मानत आहेत, हीच या चित्रपटाच्या यशाची खरी पावती आहे.

रेणुका शहाणेंचं कौतुक

सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट भावत आहे, पडद्यावर आपल्याच घरातल्या व्यक्तिरेखा वावरत असल्याचा भास होतोय. रेणुका शहाणे यांनी साकारलेली आई अनेकांना आपल्या स्वतःच्या आईची आठवण करून देते, तर ‘नन्या' हे पात्र अनेकांना आपल्या आजूबाजूला, घरात किंवा शेजारी दिसत असल्यासारखं वाटतंय. रेणुका शहाणे यांच्या सहज, संयमित अभिनयासोबतच अभिनय बेर्डेने साकारलेला 'नन्या'ही प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजतोय.

अभिनय बेर्डेचीच चर्चा

अनेक प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या मते, अभिनय बेर्डेच्या आजवरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच अनेक नामवंत दिग्दर्शकांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं असून त्याला 'डिस्कव्हरी' असं संबोधलंय.

Akshaye Khanna Video: तो सध्या काय करतोय! धुरंधरच्या प्रचंड यशानंतर अक्षय खन्ना कुठेय गायब? अलिबागचा Video समोर

(नक्की वाचा: Akshaye Khanna Video: तो सध्या काय करतोय! धुरंधरच्या प्रचंड यशानंतर अक्षय खन्ना कुठेय गायब? अलिबागचा Video समोर)

अभिनयने 12-13 किलो वजन केलं कमी

अभिनयच्या होत असलेल्या कौतुकाबद्दल दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले, ''जेव्हा अभिनयला कास्ट केलं, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. पण आज चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहताना मला ठामपणे वाटतंय की, माझा निर्णय योग्य होता. या भूमिकेला अभिनयशिवाय कोणीही इतका प्रामाणिक न्याय देऊ शकलं नसतं. तब्बल 10 महिने आम्ही फक्त निनाद कसा असेल, कसा बोलेल, कसा पाहील, कसा वागेल यावर काम केलं. अभिनयनेही प्रचंड मेहनत घेत 12-13 किलो वजन कमी केलं. आज त्यालाही त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. थिएटर व्हिजिटदरम्यान हाऊसफुल्ल गर्दीतून ‘नन्या सुपर्ब!' अशी दिलखुलास दाद ऐकली आणि  मी अक्षरशः भरून पावलो.”

Salman Khan News: मी चांगला अ‍ॅक्टर नाही, मला अ‍ॅक्टिंग येत नाही; भरकार्यक्रमात सलमान खानने केला खुलासा

(नक्की वाचा: Salman Khan News: मी चांगला अ‍ॅक्टर नाही, मला अ‍ॅक्टिंग येत नाही; भरकार्यक्रमात सलमान खानने केला खुलासा)

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत यांच्या भूमिका आहेत.  या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस'नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात आहे. सिनेमाचा प्रतिसाद बघता जोर वाढत असून शोज सुद्धा वाढत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com