जाहिरात
This Article is From Nov 28, 2025

Actor Dharmendra: धर्मेंद्र यांच्या शोकसभेत हेमा मालिनी, ईशा आणि अहानाने सहभागी होणे टाळलं? नेमकं कारण काय

Dharmendra: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. पण हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली सभेत सहभागीच न झाल्याची माहिती समोर आलीय.

Actor Dharmendra: धर्मेंद्र यांच्या शोकसभेत हेमा मालिनी, ईशा आणि अहानाने सहभागी होणे टाळलं? नेमकं कारण काय
"Dharmendra Prayer Meet : धर्मेंद्र यांच्या शोकसभेमध्ये हेमा मालिनी, अहाना आणि ईशा देओल नव्हत्या?"
Hema Malini X

Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी कुटुंबीयांनी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये शोकसभा आयोजित केली होती. शोकसभेमध्ये सिनेसृष्टीतील कित्येक सेलिब्रिटींनी हजेरी लावून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. पण धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा देओल-अहाना देओल शोकसभेत न दिसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतेय. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.  

शोकसभेमध्ये कोणकोण सहभागी झाले होते?

शोकसभेमध्ये सनी देओल, बॉबी देओल यांच्यासह संपूर्ण देओल कुटुंब आणि नातेवाईक उपस्थित होते. याव्यतिरिक्त रेखा, सलमान खान, आर्यन खान, अमिषा पटेल, सोहा अली खान, सिद्धार्थ मल्होत्रा, नेहा धुपिया, अंगद बेदी यासह अन्य सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. गायक सोनू निगम यांनी शोकसभेत सहभागी होऊन धर्मेंद्र यांचे गाजलेले गाणं गाऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.  

Dharmendra: राहिल्या फक्त आठवणी...धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, शेअर केले अतिशय खास फोटो

(नक्की वाचा: Dharmendra: राहिल्या फक्त आठवणी...धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, शेअर केले अतिशय खास फोटो)

शोकसभेत हेमा आणि त्यांच्या मुली का नव्हत्या?

हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली शोकसभेमध्ये दिसल्या नाहीत, अशी माहिती समोर येतेय. पण सोशल मीडियावर धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पित करणाऱ्या देओल कुटुंबातील हेमा याच पहिल्या सदस्य होत्या. 27 नोव्हेंबर रोजी हेमा मालिनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X अतिशय भावुक पोस्ट शेअर केली होती. हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्यासाठी आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं होतं की, ते एक चांगले पती, मित्र, मार्गदर्शक आणि जीवनाच्या प्रत्येक वळणावरील त्यांचा आधार होते. माझं वैयक्तिक झालेले नुकसान शब्दांमध्ये मांडणे शक्य नाही". भावुक पोस्टसह त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत खास 16 फोटो देखील शेअर केले आहेत. 

Dharmendra: धर्मेंद्र यांच्याबाबत जिव्हारी लागेल असं डिंपल कपाडियांचं ते कटु विधान, नंतर हेमा यांचं आयुष्य कायमचंच बदललं

(नक्की वाचा: Dharmendra: धर्मेंद्र यांच्याबाबत जिव्हारी लागेल असं डिंपल कपाडियांचं ते कटु विधान, नंतर हेमा यांचं आयुष्य कायमचंच बदललं)

सेलिब्रिटींनी हेमा यांचे खासगीमध्ये केले सांत्वन?

दरम्यान हेमा आणि त्यांच्या मुली शोकसभेत दिसल्या नाहीत. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार महिमा चौधरी, सुनीता अहुजा आणि यशवर्धन अहुजा यांना हेमा मालिनींच्या घराबाहेर पाहिलं गेलं होतं. आयोजित शोकसभेनंतर काही सेलिब्रिटी हेमा यांच्या घरी पोहोचले आणि त्यांचं सांत्वनही केले, असे म्हटलं जातंय. 1980 साली हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न झालं होतं. त्यावेळेस धर्मेंद्र विवाहित होते आणि त्यांना चार मुलंही होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com