जाहिरात
Story ProgressBack

कधी होता बॉलिवूडचा सुपरहिरो, फ्लॉप झाला आणि सुरू केला ज्यूसचा बिझनेस

'राज' आणि 'अक्सर'सारख्या चित्रपटात भूमिका साकारणारा डिनो मोरिया अचानक बॉलिवूडमधून गायब झाला होता. त्याचे अनेक चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकले नव्हते.

Read Time: 2 min
कधी होता बॉलिवूडचा सुपरहिरो, फ्लॉप झाला आणि सुरू केला ज्यूसचा बिझनेस
मुंबई:

'राज' आणि 'अक्सर'सारख्या चित्रपटात भूमिका साकारणारा डिनो मोरिया अचानक बॉलिवूडमधून गायब झाला होता. त्याचे अनेक चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकले नव्हते. त्यामुळे काही काळासाठी त्याने अभिनय क्षेत्रापासून लांब राहणं पसंत केलं. 48 वर्षीय अभिनेता डिनो मोरिया पुन्हा 2021 मध्ये आलेली एक वेब सीरिज द एम्पायर मध्ये पाहायला मिळाला होता. मात्र यातही त्याच्या कामाचं कौतुक झालं नाही. डिनो मोरिया बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही तरी  स्टार्टअप क्षेत्रात त्याने आपली छाप सोडली आहे.

डिनो आपल्या फिटनेससाठीही ओळखला जातो. खूप कमी जणांना माहिती असेल की डिनो फिटनेससंबंधित एका स्टार्टअप कंपनीचा सहसंस्थापक आहे. त्याच्या कंपनीचं नाव द फ्रेश प्रेस आहे. ही कंपनी कोल्ड प्रेस ज्यूस विकते. ज्यावेळी फळांना हायड्रोलिन मशीनमध्ये उष्णता वा ऑक्सिजनशिवाय ज्यूस काढला जातो, त्याला कोल्ड प्रेस ज्यूस म्हणतात. ही एक अत्यंत हळूवार प्रक्रिया आहे. मात्र अशा प्रकारे काढलेल्या ज्यूसमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि एनजाइम्स कायम राहतात. म्हणजेच या प्रक्रियेतून 100 टक्के शुद्ध ज्यूस काढला जातो. 

2018 मध्ये कंपनीची सुरुवात...
मुंबईत स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. यापूर्वी द फ्रेश प्रेसचे सहसंस्थापक मिथिल लोढा आणि राहुल जैन होते आणि त्यानंतर डिनो मोरिया कंपनीत एक गुंतवणुकदार आणि सहसंस्थापक म्हणून रुजू झाले. आज देशभरात या कंपनीचे 36 स्टोअर्स आहेत. कंपनीचा पीवीआर, आयनॉक्स आणि रिलायन्ससारख्या कंपन्यांसोबत करार देखील झाले आहेत. या स्टार्टअपला ग्रुहास कलेक्टिव कंज्युमरकडून आर्थिक पाठबळ मिळतं. ग्रुहास ही निखिल कामत यांची कंपनी आहे. निखिल कामत ब्रोकरेज प्लॅटफॉर्म जेरोधाचे सहसंस्थापक आहेत.  2030 पर्यंत जागतिक पातळीवर कोल्ड प्रेस ज्यूसचा मार्केट 1.5 अरब डॉलरपर्यंत पोहोचेल. भारतीय रुपयात सांगायचं झालं तर हा व्यवसाय येत्या काही वर्षात 12,000 कोटींपर्यंत पोहोचेल. भारतात याचं मार्केट २५ टक्क्यांच्या गतीने वाढलं आहे. 
  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination