
Prajakta Mali At Yerawada Jail: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहाला सदिच्छा भेट दिली. महिला कारागृहात जाऊन तिने तेथील महिला कैद्यांशी संवाद साधला. या भेटीचा उद्देश महिला कैद्यांचे मानसिक आरोग्य सुधारणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करणे हा होता.
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट करत या भेटीची माहिती सर्वांना दिली. "The best form of service is to uplift someone's state of mind" असे श्री श्री रविशंकर यांचे म्हणणे आहे, आणि याच विचाराने तिने आपल्या क्षमतेनुसार एक छोटी ध्यानधारणा कार्यशाळा घेतली. या माध्यमातून तिने महिला कैद्यांना मानसिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला. महिला कैद्यांनी देखील जोरदार टाळ्या वाजवत प्राजक्ताचं जोरदार स्वागत केले.
(नक्की वाचा - Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा गुपचूप साखरपुडा? कोण आहे सानिया चंदोक)
पाहा VIDEO
प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आपण आयुष्यात किती कृतज्ञ असले पाहिजे, याची आठवण करून देण्यासाठी आपण कधीतरी रुग्णालये, कारागृहे आणि शेतांना भेट दिली पाहिजे, असे गुरुदेव म्हणतात." या भेटीतून तिने स्वतःला याची जाणीव करून दिली, तसेच 'माहेर महिला प्रतिष्ठान' या संस्थेचे यासाठी आभार मानले.
(नक्की वाचा- सेलिब्रिटी लाईफस्टाईल, लाखो फॉलोअर्स, मात्र काम.. ED ने इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला का केली अटक?)
या उपक्रमामुळे कारागृहातील महिला कैद्यांना मानसिक आधार मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. तिच्या या कृतीमुळे समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world