
- ED ने नकली ब्यूटी प्रोडक्ट बेचने वाली इन्फ्लूएंसर संदीपा विर्क को मनी लॉन्ड्रिंग में गिरफ्तार किया है.
- संदीपा विर्क ने एक वेबसाइट से नकली और बिना उचित पंजीकरण के ब्यूटी प्रोडक्ट बेचकर करोड़ों रुपये ठगे.
- जांच में पता चला कि संदीपा का रिलायंस कैपिटल के पूर्व डायरेक्टर अंगरई नटराजन सेठुरमन से गैरकानूनी संपर्क था.
केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयाने (ED) बनावट सौंदर्य उत्पादने विकणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. संदीपा विर्क असे अटक केलेल्या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास 12 लाख फॉलोअर्स आहेत. ईडीच्या तपासात तिचा रिलायन्स कॅपिटल लिमिटेडच्या माजी संचालकाशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.
ईडीची ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) सुरू असलेल्या तपासणीचा भाग आहे. संदीपा विर्क आणि तिच्या साथीदारांवर खोटे आश्वासन देऊन आणि बनावट सौदे करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास पंजाबमधील मोहाली येथील फेज-8 पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका एफआयआरवरुन सुरू झाला होता. यामध्ये आयपीसीच्या कलम 406 आणि 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(नक्की वाचा - Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरचा गुपचूप साखरपुडा? कोण आहे सानिया चंदोक)
बनावट सौंदर्य उत्पादने विकली
संदीपा विर्क स्वतःला 'hyboocare.com' या वेबसाइटची मालक सांगत होती. ही वेबसाइट एफडीए (FDA) मंजूर सौंदर्य उत्पादने विकत असल्याचा दावा करत होती. पण तपासणीत ही उत्पादने पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. या वेबसाइटवर योग्य प्रकारे नोंदणी किंवा पेमेंट गेटवे काम करत नव्हते. तसेच, सोशल मीडियावरही तिची खास उपस्थिती नव्हती, व्हाट्सअॅप नंबर बंद होता आणि कंपनीचा पत्ताही अस्पष्ट होता.
तपासात ईडीला असेही आढळले की, संदीपा विर्कचा संपर्क रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे माजी संचालक अंगराई नटराजन सेथुरमन यांच्यासोबत होता. दोघांमध्ये बेकायदेशीर 'लायजिंग'च्या कामाबद्दल संभाषण झाले होते. सेथुरमन यांच्या घरावर केलेल्या तपासणीत असेही समोर आले की त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कंपनीच्या निधीचा गैरवापर केला.
(नक्की वाचा- KBC 17: 'ऑपरेशन सिंदूर' ची गरज का होती? कर्नल सोफिया कुरेशी यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं कारण, पाहा Video)
2018 मध्ये सेथुरमन यांना रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेडमधून सुमारे 18 कोटी रुपयांचे कर्ज कोणत्याही ठोस तपासणीशिवाय देण्यात आले होते. या कर्जाच्या अटी इतक्या शिथिल होत्या की, व्याज आणि मूळ रक्कम परत करण्याची कोणतीही अट नव्हती. याशिवाय, त्यांना रिलायन्स कॅपिटल लिमिटेडमधून नियमांविरोधात 22 कोटी रुपयांचे गृहकर्ज देखील मिळाले. यापैकी मोठ्या रकमेचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आणि ती रक्कम अजूनही बाकी आहे.
छापेमारीदरम्यान अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, रेकॉर्ड आणि साक्षीदारांचे जबाब ईडीने जप्त केले आहेत. 12 ऑगस्ट रोजी संदीपा विर्कला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आली असून 14 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. पुढील दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world