जाहिरात

Prarthana Behere: 'आयुष्य जणू थांबल्यासारखं..', प्रार्थना बेहेरेंच्या वडिलांचे अपघाती निधन, भावुक पोस्ट

काल परवापर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

Prarthana Behere: 'आयुष्य जणू थांबल्यासारखं..', प्रार्थना बेहेरेंच्या वडिलांचे अपघाती निधन, भावुक पोस्ट

Prarthana Behere Passed Away:  मराठी सिनेसुष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचं रस्ते अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या निधनाने  अभिनेत्रीसह तिच्या कुटुंबियाला मोठा धक्का बसला आहे.  प्रार्थना बेहेरेने  सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट...

“मर के भी किसी को याद आएंगे
किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है “
माझे बाबा १४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका road अपघातात झाले. बाबा तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय
तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो.

Sachin Pilgaonkar: 'सतिशने जाण्या आली मला मेसेज केला होता तोपर्यंत..' सचिन पिळगावकरांची पोस्ट चर्चेत

तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं. तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे.आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे.

पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय. तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे.

Salman Khan News: पाकिस्तानचा बालिशपणा! अभिनेता सलमान खान अतिरेकी घोषित, अटक होणार?

डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. काळजी करू नका... मी खुप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com