जाहिरात

'कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं..', प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची काळीज पिळवणारी पोस्ट

Priya Marathe Death: मुंबईमध्ये प्रियाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रिया मराठेची मैत्रिण अभिनेत्री प्रार्थना बेहरेला अश्रु अनावर झाल्याचं पाहायला मिळाले.

'कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं..', प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीची काळीज पिळवणारी पोस्ट

Prarthana Behere Emotional Post On Priya Marathe:  मराठी मालिका, चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मनोरंजन जगतावर शोककळा पसरली आहे. कर्करोगामुळे प्रिया मराठेने वयाच्या अवघ्या  ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रविवारी मुंबईमध्ये प्रियाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रिया मराठेची मैत्रिण अभिनेत्री प्रार्थना बेहरेला अश्रु अनावर झाल्याचं पाहायला मिळाले. प्रार्थनाला जिवलग मैत्रीण गमावल्याचा मोठा धक्का बसला असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. 

प्रिया मराठेसाठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेची भावुक पोस्ट

"ए वेडे प्रिया , पियू , परी , प्री , ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती. माझी वेडे
आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्‌तास बोलत बसायचो. मॅगी, भुर्जी, कॉफी हे सगळं आमचं छोटंसं जग होतं.
खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरापर्यंत जागणं, त्या क्षणांना काही तोड नाही," असं प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं. अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला, अशी आठवणही प्रार्थनाने सांगितली.

"ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला. कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती.

तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं, “तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे, हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय. जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.” कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज  सगळं अजूनही माझ्यासोबत आहे.माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा, असं शेवटी ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Priya Marathe News: पार्टीत भेट, मैत्री अन् फिल्मी प्रपोज.. अशी आहे प्रिया मराठे- शंतनू मोघेची LOVE STORY

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com