जाहिरात
This Article is From Jun 08, 2025

Housefull 5: मास्क घालून अक्षय कुमार प्रेक्षकांच्या गर्दीत, लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया; पाहा VIDEO

अलिकडेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार एका किलरचा मुखवटा घालून लोकांमध्ये फिरताना दिसत आहे. मात्र लोकांनी त्याला ओळखलेही नाही.

Housefull 5: मास्क घालून अक्षय कुमार प्रेक्षकांच्या गर्दीत, लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया; पाहा VIDEO

Akshay Kumar Viral Video: अक्षय कुमारचा अलिकडेच प्रदर्शित झालेला कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नर्गिस फाखरी, जॅकलिन फर्नांडिस आणि सौंदर्या शर्मा अभिनीत हा चित्रपट 6 जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत असतानाच खुद्द अभिनेता अक्षय कुमार आता चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मैदानात उतरला आहे. अलिकडेच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार एका किलरचा मुखवटा घालून लोकांमध्ये फिरताना दिसत आहे. मात्र लोकांनी त्याला ओळखलेही नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार  किलरचा मुखवटा घालून नेटिझन्सना त्यांच्या प्रतिक्रिया विचारताना दिसत आहे. अनेकांनी चित्रपटाला शानदार असल्याचे म्हटले आहे.. मात्र कोणीही अक्षय कुमारला ओळखले नाही. 'असेच मी आज वांद्रे येथील हाऊसफुल 5 शोमधून बाहेर पडणाऱ्या लोकांची मुलाखत घेण्यासाठी किलरचा मुखवटा घालून जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी पकडला जाणार होतो पण त्याआधीच पळून गेलो. छान अनुभव,असं त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

'हाऊसफुल 5' कलेक्शन
हाऊसफुलच्या 5 ने  बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. सॅकनिकच्या आकडेवारीनुसार, 'हाऊसफुल 5' ने पहिल्या दिवशी भारतात 24 कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवशी जगभरात 40 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी, शनिवारी, चित्रपटाने स्थानिक पातळीवर 30 कोटी रुपये कमावले.

 ज्यामुळे आतापर्यंत त्याचे एकूण कलेक्शन सुमारे 54 कोटींची कमाई झाली आहे. देशभरात चित्रपटाने 33.18 ऑक्युपन्सी राखली आणि दिवसभर हा आकडा सातत्याने वाढत राहिला. चित्रपटाचा पहिला रविवार अजून येणे बाकी असल्याने, चाहते आणि तज्ञ हाऊसफुल 5 त्याच्या पहिल्या आठवड्यात किती प्रगती करू शकते हे पाहण्यास उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Nilesh Rane: 'नितेशने जपून बोलावं, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून...' निलेश राणेंचा भावाला सल्ला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com