बॉलिवूडमधील अनेक कुटुंबाला वारसा आहे. अशा कुटुंबातील मुलं पिढ्यानपिढ्या चित्रपटात पाहायला मिळतात. सर्वांची वेगवेगळी कहाणी आहे. मात्र खन्ना कुटुंब याबाबतीत सर्वांपेक्षा वेगळं आहे. त्यांची कहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. खन्ना कुटुंब सध्या चर्चेत आहे. यामागे कारण आहे अक्षय खन्ना. अक्षय खन्ना सध्या चित्रपट धुरंधरमुळे चर्चेत आहे. त्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. अक्षय खन्ना दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचे सुपूत्र. अक्षय खन्नाच्या कुटुंबाविषयी जाणून घेऊया...
अक्षय खन्नाचं कुटुंब...

अक्षय खन्नाच्या वडिलांचं नाव विनोद खन्ना. विनोद खन्ना यांना तीन भाऊ आणि एक भाऊ होता. विनोद खन्ना यांचा भाऊ प्रमोद खन्नादेखील अभिनय क्षेत्रात होते. प्रमोद खन्ना यांनी दबंग ३ मध्ये विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांची भूमिका साकारली. विनोद खन्ना ७० आणि ८० च्या दशकातील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते. ते अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते.

विनोद खन्नांची स्वीकारला होता संन्यास

विनोद खन्ना आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. एका व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या विनोद खन्ना यांच्या कुटुंबाचा त्यांच्या चित्रपटातील करिअरला विरोध होता. परंतु १९६० मध्ये ते कॉलेजमध्ये एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. जिथे त्यांची पहिली पत्नी गीतांजली तलेयारखान हिच्याशी ओळख झाली. ती वकील आणि व्यावसायिकांच्या पारशी कुटुंबातून आली होती आणि एक मॉडेल होती.१९७१ मध्ये त्यांनी गितांजलीसोबत लग्न केलं. पहिल्या लक्षापासून विनोदला राहुल आणि अक्षय नावाची दोन मुलं झाली.
१९९० मध्ये त्यांनी दुसरं लग्न केलं. ते आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर असताना त्यांनी सर्व सोडलं अन् संन्यास स्वीकारला. त्यांनी अध्यात्माला जवळ केलं. ते ओशोचे शिष्य बनले. त्यावेळी अक्षय केवळ पाच वर्षांचे होते. विनोद खन्ना यांच्या या निर्णयामुळे कुटुंबाला धक्का बसला. यानंतर विनोद खन्ना पहिल्या पत्नीपासून वेगळे झाले.

हे दुसरं कुटुंब

विनोद यांनी सर्व त्यागलं अन् ओशोला शरण गेले. १९८५ मध्ये त्यांनी पत्नीपासून घटस्फोट घेतला. काही वर्षांनंतर ओशोचा आश्रम तोडल्यानंतर ते पुन्हा चित्रपटसृष्टीत आले. येथे ४३ व्या वाढदिवशी त्यांनी भेट कवितासोबत झाली आमि ते पहिल्याच नजरेत प्रेमात पडले. १९९० मध्ये विनोद आणि कविताने लग्न केलं. या लग्नानंतर विनोदला दोन मुलं झाली. खन्ना आणि श्रद्धा खन्ना. साक्षी यानेही आपल्या वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. अक्षयचे आपला सावत्र भाऊ-बहिणींसोबत चांगले संबंध आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world