Allu Arjun Arrest News: संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लु अर्जुनला अटक करण्यात आली आहे. 'पुष्पा 2' सिनेमाच्या प्रीमिअर शो वेळेस हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. याच प्रकरणी अल्लु अर्जुनविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. अल्लु अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. संबंधित एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी अल्लु अर्जुनने बुधवारी (11 डिसेंबर) तेलंगणा उच्च न्यायालयात धावही घेतली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमके काय आहे प्रकरण?
सुपरस्टार अल्लु अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी 4 डिसेंबर रोजी रात्री संध्या थिएटरमध्ये मोठी गर्दी झाली होती. पण यावेळेस चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या घटनेत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षीय मुलगा जखमी झाला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यामध्ये 5 डिसेंबरला अल्लु अर्जुन, त्याच्या सुरक्षा टीमसह थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
(नक्की वाचा: Allu Arjun Story फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार')
पोलीस तपासादरम्यान थिएटरच्या मालकांपैकी एकाला, वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरमधील खालील बाल्कनीच्या प्रभारी व्यक्तीला अटक केली.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun has been brought to Chikkadpally police station in Hyderabad for questioning in connection with the case of death of a woman at Sandhya theatre on December 4. pic.twitter.com/pvBOkkc3JO
— ANI (@ANI) December 13, 2024
दरम्यान अल्लु अर्जुनने महिलेच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणाही केली होती.
Deeply heartbroken by the tragic incident at Sandhya Theatre. My heartfelt condolences go out to the grieving family during this unimaginably difficult time. I want to assure them they are not alone in this pain and will meet the family personally. While respecting their need for… pic.twitter.com/g3CSQftucz
— Allu Arjun (@alluarjun) December 6, 2024
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world