जाहिरात

Amitabh Bachchan: KBC ज्यनियरचा व्हिडीओ व्हायरल, दुसरीकडे बिग बींनी मागितली माफी; चाहते संभ्रमात

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

Amitabh Bachchan: KBC ज्यनियरचा व्हिडीओ व्हायरल, दुसरीकडे बिग बींनी मागितली माफी; चाहते संभ्रमात
Social Media

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती 17' मधील एका केबीसी जुनिअर एपिसोडमुळे चर्चेत आहेत. ज्यात एका मुलाने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांचे दोन गट पडले होते. मात्र, या सगळ्यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे, ज्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.

सुरुवातीला लोकांना वाटले की त्यांची ही माफी केबीसीच्या घटनेशी संबंधित असावी, पण त्यांच्या 'X' पोस्टने परिस्थिती स्पष्ट केली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "सर्वात आधी, मी त्या सर्व लोकांची माफी मागतो, ज्यांनी 11 ऑक्टोबर रोजी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या, पण मला त्यांना उत्तर देण्याची संधी मिळाली नाही. माझा फोन अचानक खराब झाला, ज्यामुळे मी कोणालाही उत्तर देऊ शकलो नाही. तुम्हा सर्वांप्रति माझे मनःपूर्वक आभार आणि खूप प्रेम.".

11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांनी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने जगभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना सोशल मीडिया, फोन कॉल्स आणि मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षी अमिताभ बच्चन यांच्याकडून चाहत्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी याला केबीसीच्या वादाशी जोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पोस्टने हे स्पष्ट केले की माफीचे कारण केवळ तांत्रिक बिघाड हे होते.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

अमिताभ बच्चन यांच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी विविध प्रकारच्या मजेशीर कमेंट्सकेल्या. एका युजरने लिहिले, "सर, तुमच्या वाढदिवसाला इतके मेसेज आले की फोननेही उत्तर देणे सोडून दिले!" दुसऱ्या एकाने म्हटले, "काही हरकत नाही सर, तुमचा वाढदिवस शानदार झाला असेल अशी आशा आहे." एका चाहत्याने तर मस्करीत म्हटलं की, "मी तर विचार करत होतो की फक्त माझाच फोन जुना आहे, पण तुम्हीही जुन्या फोनवर अडकला आहात!".

Listen to the latest songs, only on JioSaavn.com