
अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. ते आज ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपणही असावे असे स्वप्न बॉलिवूडमधल्या प्रत्येक स्टारचे असते. पण अमिताभ यांना मिळालेल्या यश पर्यंत जाणे तर सोडाच पण त्यांच्या जवळपासही सध्या कोणी नाही. पण अमिताभ यांना या यशापर्यंत पोहचण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला होता. म्हणूनच अमिताभ यांना महानायक म्हणून ही ओळखले जाते. पण याच महानायकाने कधी काळी कोणत्या हिरोईनची चप्पल उचलली होती. शिवाय सर्वां समोर चापटही खाल्ली होती. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमिताभ बच्चन आपल्या सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्रीचे सँडल हातात घेवून फिरायचे. ही अभिनेत्री होती वहीदा रहमान. सुनील दत्ता आणि वहीदा रहमान यांचा रेश्मा और शेरा हा चित्रपट होता. त्यात अमिताभ बच्चन यांची एक छोटी भूमिका होती. त्यावेळी ते एक स्ट्रगलर होते. या चित्रपटात एक सिन होता. त्यात वहीदा रहमान यांना वाळवंटात जावून गरम वाळूमध्ये चालायचे होते. त्यावेळी वहीदा रहमान यांचा सिन संपला. त्याच वेळी त्यांच्या चप्पल घेवून अमिताभ बच्चन धावत गेले होते. वहीदा रहामान यांच्या पायाला चटका लागू नये यासाठी त्यांनी असे केले होते. हा आपल्या आयुष्यातला खास क्षण होता असे अमिताभ नेहमीच सांगतात.
ज्या वहीदा रहमान यांच्यासाठी अमिताभ बच्चन यांनी चप्पलही उचलल्या, त्याच वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांना जोरात चापट लगावली होती. खरं तर ही एका चित्रपटातल्या सिनची आवश्यकता होती. त्या सिनमध्ये वहीदा रहमान यांनी अमिताभ यांना चापट मारली होती. हा सिन एका टेकमध्ये पूर्ण व्हाला अशी डायरेक्टरची इच्छा होती. त्यामुळे यामध्ये मारली गेलेली चापट खरी मारली गेली. त्या काळात आपल्याला वहीदा रहमान यांच्यावर प्रेम जडले होते याची कबूलीच अमिताभ यांनी एका मुलाखतीत दिली आहे. शिवाय आपण वहीदा रहमान यांचा सन्मान करतो आणि करत राहू असेही त्यांनी सांगितले होते.
अमिताभ बच्चन, रेखा, जया बच्चन यांच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण वहीदा रहमान यांच्याबाबत फार थोड्या लोकांना या गोष्टी माहित आहेत.अमिताभ यांनीही काही मुलाखतीत यावर प्रकाश टाकला आहे. नंतरच्या काळात अमिताभ हे सुपरस्टार झाले. मात्र जुन्या आठवणी ते कधीही विसरले नाहीत. किंवा त्या नाकारल्या ही नाहीत. वहीदा रहमान यांच्या चप्पल उचलणं हे आपल्या आयुष्यातला खास क्षण होता हे सांगायला ही ते कधी कचरले नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world