Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी घेतली आहे. तसेच सुपरस्टार सलमानची हत्या करण्यासाठी बिश्नोई गँगने 18 वर्षांहून लहान मुलाला तयार करण्यात आले होते.
(नक्की वाचा: अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात)
आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासे
शूटर्स पुढील कारवाईसाठी गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोई या दोघांच्या आदेशाची वाट पाहत होते, अशीही माहिती पोलिसांनी आरोपपत्रामध्ये नमूद केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व धक्कादायक खुलासे आरोपपत्रात करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, Youtube व्हिडीओ आला समोर)
Maharashtra | Navi Mumbai Police, which is investigating the case of an attempt to murder actor Salman Khan, have filed a chargesheet against five arrested accused of the Lawrence Bishnoi gang in this case. The accused were also preparing to buy AK-47 rifles, AK-92 rifles and…
— ANI (@ANI) July 2, 2024
(नक्की वाचा: सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपी अनुज थापनचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू)
पाकिस्तानातून शस्त्रात्रे मागावण्याची होती योजना
पोलिसांनी आरोपपत्रामध्ये म्हटले आहे की, सलमानची हत्या करण्यासाठी आरोपी पाकिस्तानमधून आधुनिक शस्त्रास्त्रे AK 47, AK 92, M16 आणि तुर्की बनावटीची झिगाना शस्त्रे विकत घेण्याची योजना आखत होते.पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसवालाचीही अशाच प्रकारच्या शस्त्रांच्या मदतीने हत्या करण्यात आली होती. याच हत्यारांचा वापर करून सलमान खानची हत्या करण्याचा आरोपींचा कट होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय की, ऑगस्ट 2023 ते एप्रिल 2024 दरम्यान सलमान खानच्या हत्येचा कट रचला गेला होता.
जवळपास 60 ते 70 लोक सलमान खानच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. हे सर्वजण सलमान खानचे मुंबईतील घर, पनवेलमधील फार्म हाऊस आणि गोरेगाव फिल्मसिटीतील त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते, अशी माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे. सर्व शूटर्स पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि गुजरातमध्ये लपून बसल्याचीही माहिती समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world