जाहिरात

VIDEO: फुटपाथवर झोपला बॉलिवूडचा कॉमेडी किंग, अवस्था पाहून नेटकरीही हैराण; व्हिडिओ तुफान व्हायरल!

ज्यामध्ये तो रात्री गंगा नदीच्या काठावर निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओला 'तारे जमीन पर' असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

VIDEO: फुटपाथवर झोपला बॉलिवूडचा कॉमेडी किंग, अवस्था पाहून नेटकरीही हैराण; व्हिडिओ तुफान व्हायरल!

Bollywood Actor Ganga Ghat Viral Video:  बॉलिवूडचा कॉमेडी किंग आणि हरहुन्नरी अभिनेता सुनील ग्रोव्हर अभिनयासोबतच त्याच्या साधेपणामुळेही नेहमीच चर्चेत असतो. सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो त्याच्या पोस्टची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या  सुनील ग्रोव्हर त्याच्या याच साधेपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुनील ग्रोव्हरने त्याच्या whosunilgrover या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रात्री गंगा नदीच्या काठावर निवांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओला 'तारे जमीन पर' असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Raakh: रंगा-बिल्ला हत्याकांडावर आधारित वेब सीरिजला हिंदू विरोधी का म्हटले जातेय? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

 सुनील ग्रोव्हरचा हा व्हिडिओ आतापर्यंत २१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्याला १,५१,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने शेअर केला जात असून चाहते त्यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर रात्री गंगा नदीच्या काठावर झोपलेला दिसत आहे. तो घाटावर एकटा नाही, तर गर्दीत इतर लोकांमध्ये आहे. आकाशातील लुकलुकणारे तारे, वाहणारी गंगा नदी आणि घाटावरील शांत वातावरणात सुनील ग्रोव्हर निवांत पडल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कोणताही देखावा नाही. सुनील ग्रोव्हर निसर्गाच्या आणि गंगेच्या सान्निध्यात काही शांत क्षणांचा आनंद घेताना दिसत आहे. हा साधेपणा लोकांच्या मनाला भिडत आहे. अनेकांनी या क्षणाचे वर्णन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी असे केले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत. 

यावर प्रतिक्रिया देताना एका युझरने लिहिले, "याच कारणामुळे तुम्ही लाखो लोकांच्या हृदयात राहता." दुसऱ्या एका चाहत्याने एवढी मोठी कामगिरी करूनही जमिनीवर पाय आहेत, असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने हेच खरं आयुष्य आहे. कठोर परिश्रम तुम्हाला नम्र बनवतात आणि पुढे जायला शिकवतात, असं म्हटलं आहे. थोडक्यात सुनील ग्रोव्हरच्या या व्हिडिओने चाहत्यांचं मन जिंकले आहे. 

( नक्की वाचा : Black Warrant : 40 वर्षांनी पुन्हा ताजं झालेलं रंगा-बिल्ला प्रकरण काय आहे? त्यानंतर दिल्ली कशी बदलली? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com