
Nimrat Kaur Video - ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातील कलाकारांनी आणि मान्यवरांनी भारतीय सैन्यदलाचे कौतुक करत पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 6 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरनेदेखील सैन्य दलाचे कौतुक केले आहे. भारत सरकारने आणि सैन्य दलाने घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य होता असे तिने म्हटले असून यानिमित्ताने सगळ्यांना आठवण करून दिली की ती देखील एका शहीद सैन्य अधिकाऱ्याची मुलगी आहे. निम्रत कौर हिचे वडील मेजर भूपेंद्र सिंग हे शहीद झाले होते. त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. निम्रत कौरने ANI शी बोलताना म्हटले की, पहलगाममध्ये जे झालं ते आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं आहे. या घटनेनंतर मला खूप वाईट वाटलं. मी एका शहिदाची मुलगी असून मी माझ्या वडिलांना 1994 मध्ये गमावलं आहे. वाईट परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यात काय होतं हे मी पाहिलेलं आहे. या गोष्टी अत्यंत वेदनादायी असतात. आपण सगळ्यांनी पाहिलं की भारतीय सैन्य दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. मी या कारवाईचे समर्थन करते.
#WATCH | #OperationSindoor | Mumbai, Maharashtra: Actor Nimrat Kaur says, "We closely observed what happened in Pahalgam. It was extremely unfortunate. I am a martyr's daughter, and I lost my father in Kashmir in 1994. I can well understand what drastic changes a family goes… pic.twitter.com/6VucWjULer
— ANI (@ANI) May 7, 2025
निम्रतने म्हटलंय की, फक्त आपल्या देशातच नाही तर जगभरात कुठेही दहशतवादाला थारा मिळता कामा नये. दहशतवादामुळे अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. आपल्या कुटुंबासह लोकं सुट्टी साजरी करत असतात,त्याचवेळी त्यांच्यासोबत असं काहीतरी होतं. यापेक्षा अधिक वेदनादायी काय असू शकतं ? मी या देशाची नागरीक या नात्याने हे आवाहन करते आहे की आपण सगळ्यांनी आपल्या सैन्याच्या आणि भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहीजे. निम्रत कौर ही एका शीख कुटुंबात जन्माला आली आहे. सुरुवातीला मॉडेलिंगच्या क्षेत्रात उतरलेल्या निम्रतने नंतर अभिनयक्षेत्र निवडलं होतं. लंचबॉक्समधील भूमिकेने तिने अनेकांची मने जिंकली आहेत. अमेरिकन वेबसिरीज होमलँडमध्येही चिने भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारसोबत तिची भूमिका असलेला एअरलिफ्टही चांगलाच गाजला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world