जाहिरात
This Article is From May 29, 2024

50 वर्षीय ऐश्वर्याचे ते फोटो पाहून चाहते घायाळ, 6 तासांत मिळाले लाखोंच्या संख्येनं लाइक्स

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक मिळाले आहेत.

50 वर्षीय ऐश्वर्याचे ते फोटो पाहून चाहते घायाळ, 6 तासांत मिळाले लाखोंच्या संख्येनं लाइक्स

Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमधील लुक पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने इन्स्टाग्रामवर हटके लुकमधील स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील मेकअप रुममध्येच फोटोशूट केले आहे. ब्लॅक अँड व्हाइट थीममधील फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण वयाच्या 50व्या वर्षीही अभिनेत्रीचा लुक अतिशय सुंदर व मनमोहक दिसत आहे. ज्या पद्धतीने तिने मेकअप आणि हेअरस्टाइल फ्लाँट केले आहे, चाहत्यांची नजर तिच्या फोटोंवरच खिळून राहिली आहे. तसेच केवळ सहा तासांमध्ये अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.   

(नक्की वाचा: दंगल फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट)

ऐश्वर्याने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर तिचे मनमोहक फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये हार्ट आणि क्युट इमोजी शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ऐश्वर्याने सुंदर पोझ दिल्याचे आपण पाहू शकता. दुसऱ्या फोटोमध्ये ती मसकारा लावताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये लिपस्टिक लावत आरशामध्ये पाहून तिने पोझ दिली आहे आणि चौथ्या फोटोमध्ये हेअरस्टाइल करताना तिची सुंदर अदा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. हे सर्व फोटो लॉरियल ब्रँडच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.   

(नक्की वाचा: दिव्या-अपूर्व हनीमूनहून परतताच सुरु झाली घटस्फोटाची चर्चा, काय आहे कारण?)

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024मध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे दोन लुक चाहत्यांना पाहायला मिळाले. पहिल्या लुकमध्ये तिनं क्रीम आणि काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता तर दुसऱ्या लुकसाठी तिनं निळ्या-चंदेरी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. 

(नक्की वाचा: पायल कपाडियाने कान्समध्ये रचला इतिहास, यापूर्वीही देशासाठी केलीय अशी महत्त्वपूर्ण कामगिरी)

Asha Bhosle | आशा भोसले यांच्यासोबतची 'ती' मुलगी कोण?  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com