Sridevi News: सुपरस्टार रजनीकांत यांनी मागील पाच दशकांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. वयाच्या 74व्या वर्षीही रजनीकांत सिनेमांमध्ये नायकाची भूमिका बजावतात. सिनेसृष्टीतील कारकिर्दीमध्ये त्यांनी कित्येक अभिनेत्रींसोबत काम केलंय. ज्यामध्ये श्रीदेवी, ऐश्वर्या राय यासारख्या अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे. पण श्रीदेवी आणि रजनीकांत या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय. या दोघांनी असंख्य सिनेमांमध्ये काम केलं. श्रीदेवी आणि रजनीकांत यांचं केवळ ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीन देखील चांगंल बाँडिंग होतं. एकदा थलायवा रजनीकांत आजारी असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळेस श्रीदेवीनं रजनीकांत यांची प्रकृती ठीक व्हावी, यासाठी एक- दोन दिवस नव्हे तर संपूर्ण सात दिवसांचा उपवास केला होता.
रजनीकांत यांच्यासाठी केला उपवास
रजनीकांत आणि श्रीदेवीने जवळपास 25 सिनेमांमध्ये एकत्रित काम केलं होतं. हिंदी भाषिक सिनेमांव्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषिक सिनेमांमध्ये जास्त प्रमाणात काम केलं. वर्ष 2011मध्ये एका मुलाखतीत रजनीकांत यांनी सांगितलं होतं की, राणा सिनेमाच्या शुटिंगदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारांसाठी त्यांना सिंगापूरकडे रवाना व्हावं लागलं. जेव्हा श्रीदेवीला माझी प्रकृती बिघडल्याची माहिती समजली तेव्हा ती खूप घाबरली. श्रीदेवीने रजनीकांत यांच्यासाठी शिर्डीमध्येही जाण्याचा निर्णय घेतला. शिर्डीमध्ये जाऊन तिने साईबाबांचं दर्शन घेतलं आणि रजनीकांत यांच्यासाठी प्रार्थना केली. यानंतर श्रीदेवीने सात दिवस उपवासही केला.
(नक्की वाचा: Akshaye Khanna : रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमामध्ये खलनायक बनला अभिनयाचा हीरो अक्षय खन्ना, किती मिळालं मानधन? वाचा)

(नक्की वाचा: Dhurandhar Movie: अक्षय खन्नाच्या Ex गर्लफ्रेंडची ती पोस्ट चर्चेत, धुरंधर अभिनेत्याने नात्याबाबत काय सांगितलं होतं?)
रजनीकांतची यांची भेट घेतली
रजनीकांत घरी परतल्यानंतर श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत त्यांना भेटायला पोहोचली. रजनीकांत यांची प्रकृती ठीक असल्याचे पाहिल्यानंतर श्रीदेवीच्या जीव भांड्यात पडला. रजनीकांत हे श्रीदेवी यांच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते, पण दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world