
बॉलिवूडमध्ये भाई-भतीजावाद खूप पाहायला मिळतो. याच कारणामुळे बाहेरच्या व्यक्तींसाठी बॉलिवूडमध्ये तग धरणे कठीण होते. फिल्म इंडस्ट्रीत काम करणारे बहुतेक स्टार एकमेकांचे नातेवाईक आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि आफताब शिवदासानी यांच्यातही खास नाते आहे. करीना आणि आफताबला 'कमबख्त इश्क' चित्रपटात एकत्र पाहिले गेले होते. पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की आफताब आणि करीना यांच्यात काय नाते आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
करिश्मा आणि करीना कपूर शो-मॅन राज कपूर यांच्या नाती आहेत. रणधीर कपूर यांच्या मुली आहेत. रणधीर कपूर यांची पत्नीचे नाव बबिता आहे. त्यांचे लग्नापूर्वीचे आडनाव शिवदासानी होते. लग्नानंतर त्या बबिता शिवदासानीवरून बबिता कपूर झाल्या आहेत. आफताब दिवंगत अभिनेत्री बबिताच्या नात्यातील आहे. आफताबचे वडील प्रेम शिवदासानी हे अभिनेत्री बबिताचे वडील हरी शिवदासानी यांचे भाचे होते. बबिता नात्याने आफताबची आत्या लागते. त्यामुळे आफताब, करिश्मा आणि करीनाचा भाऊ लागतो. तसेच, बबिता आणि दिवंगत दिग्गज अभिनेत्री साधना या बहिणी आहेत. कपूर खानदानाशी इतका मोठा संबंध असूनही आफताब बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडू शकला नाही.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
आफताबची आत्या साधना आणि बबिता या बहिणी असूनही एकमेकींशी बोलत नव्हत्या. दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा होता. काही रिपोर्ट्सनुसार, हे वैयक्तिक कारणांमुळे होते. दोघीही त्यांच्या काळातल्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आफताब शिवदासानी बालपणापासूनच चित्रपटांमध्ये सक्रिय होता. अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसला आहे. आफताबने अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया', अमिताभ बच्चनच्या 'शहंशाह' चित्रपटात त्यांच्या विजय कुमार श्रीवास्तवच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
याशिवाय तो 'चालबाज', 'अव्वल नंबर' आणि 'इन्सानियत'मध्ये बालकलाकार म्हणून दिसला आहे. राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता म्हणून 'मस्त' चित्रपटातून त्याला संधी दिली. याच चित्रपटातून त्याला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्याच्या हिट चित्रपटांमध्ये 'मस्ती','आवारा पागल दिवाना' आणि 'हंगामा' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आता तो 'मस्ती 4' च्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world