जाहिरात

Bollywood News: बॉलिवूडची पोलखोल! शोकसभेत काय होतं? आशिष विद्यार्थींनी सर्वच सांगितलं

काहींनी काळा चष्मा लावला होता. मी रंगीत कपड्यांमध्ये होतो. मला अस्वस्थ वाटत होते असं आशिष विद्यार्थी म्हणाले.

Bollywood News: बॉलिवूडची पोलखोल! शोकसभेत काय होतं? आशिष विद्यार्थींनी सर्वच सांगितलं
मुंबई:

अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी बॉलिवूडमधील एक कटू सत्य उघड केले आहे. चित्रपटसृष्टीत कोणाचा मृत्यू झाल्यावर स्टार्स लोक पांढरे कपडे आणि काळा चष्मा लावून येतात. जेव्हा त्यांनी हे पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांना ते खूप विचित्र वाटलं. स्टार्स लोक अंत्यसंस्कारातही व्यावसायिक कसे बनतात, हे ही त्यांनी सांगितलं आहे. 1997 मध्ये चित्रपट दिग्दर्शक मुकुल आनंद यांची शोकसभा होती. त्यावेळी काय घडलं याची आठवण करून देताना त्यांनी बॉलिवूडची पोलखोल केली आहे. .

'मुकुल मृत्यूपूर्वी सलमान खान आणि संजय दत्तसोबत 'दस' चित्रपट बनवत होते. आम्ही शूटिंगसाठी अमेरिकेला गेलो होतो. मी पहिल्यांदाच अमेरिकेत गेलो होतो. असं आशिष विद्यार्थी यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले जेव्हा आम्ही परत आलो, तेव्हा मुकुलचा मृत्यू झाला. मी त्यावेळी नवीन होतो. मी मुंबईत अजूनपर्यंत कुणाच्या शोक सभेला गेलो नव्हतो. जेव्हा मी पहिल्यांदा तिथे गेलो.तेव्हा मी पाहिले की सर्व लोकांनी पांढरे कपडे घातले होते.

नक्की वाचा - Alia Bhatt News: आलिया भट्टची लाखोंची फसवणूक, माजी PA ला बंगळुरूतून अटक

काहींनी काळा चष्मा लावला होता. मी रंगीत कपड्यांमध्ये होतो. मला अस्वस्थ वाटत होते. जेव्हा लोक प्रार्थना सभेतून जाऊ लागले, तेव्हा परिस्थिती आणखीनच विचित्र झाली. मला बाहेर पडताना खूप वाईट वाटत होते. मग एकाने मला कोपर मारून म्हटले की, 'खूप वाईट वाटतय पणचला पुढील तारखांवर बोलूया'.' त्यानंतर मला धक्का बसला असं ही ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, 'मी त्यांचे बोलणे ऐकले आणि खाली मान घालून, हात जोडून त्यांना उत्तर दिले.

नक्की वाचा - Prarthana Behre: 'सखे गं साजणी' चित्रपटाचं पोस्टर आलं समोर, कलाकारांची नाव मात्र गुलदस्त्यात

बाहेर पडल्यावर मी आश्चर्यचकित झालो. पाहिले की येथे काय घडत आहे, कारण जेव्हा आपण एखाद्याशी वैयक्तिकरित्या जोडलेले नसतो, तेव्हा आपल्याला दुःख होत नाही. येथे सर्वजण व्यावसायिक म्हणून दुःख व्यक्त करत होते. हे अगदी असे होते, जसे तुम्ही रुग्णालयात आहात आणि मी विचारतो की सर्व ठीक आहे का?  नंतर इतर गोष्टींकडे लक्ष देतो.  अभिनेत्याने सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्याच्या ट्रेंडवरही टीका केली. ते म्हणाले, 'आजकाल 'ओम शांती, लवकर गेले' असा ट्रेंड आहे.'या सर्व गोष्टी त्यांच्या समजण्यापलीकडच्या आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com