जाहिरात

Video शत्रूवरही अशी वेळ येऊ नये! मुलाच्या कबरीजवळ बॉलिवूड अभिनेत्रीला अश्रू अनावर,म्हणाली लग्नाने सर्व ओरबाडलं

Celina Jaitly News: बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या पती पीटर हागसोबतचा घटस्फोट आणि मुलाच्या निधनाच्या दुःखद काळातून जात आहे. सोशल मीडियावर तिचा इमोशन व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video शत्रूवरही अशी वेळ येऊ नये! मुलाच्या कबरीजवळ बॉलिवूड अभिनेत्रीला अश्रू अनावर,म्हणाली लग्नाने सर्व ओरबाडलं
"Celina Jaitly News: सेलिना जेटलीने सोशल मीडियावर शेअर केलाय इमोशन व्हिडीओ"
  • बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या घटस्फोटाच्या खटल्यासह मुलाच्या मृत्यूमुळे मानसिक त्रास सहन करत आहे
  • सोशल मीडियावर मुलाची कबर स्वच्छ करतानाचा भावनिक व्हिडीओ केला शेअर
  • सेलिनाने पती पीटर हागवर मुलांना भेटू न देण्याचे गंभीर आरोप केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Celina Jaitly News: बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय कठीण काळाचा सामना करत आहे. एकीकडे पती पीटर हागसोबत तिचा घटस्फोटाचा खटला सुरू आहे, तर दुसरीकडे मुलाला गमावल्याचेही दुःख आहे. अलीकडेच सेलिनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तिचे चाहतेही भावुक झाले आहेत. व्हिडीओमध्ये ती तिचा मुलगा शमशेरला गमावल्यानंतर त्याच्या कबरीची स्वच्छता करताना दिसत आहे. यादरम्यान ती स्वतःला सावरू शकली नाही आणि तिला रडू कोसळले.

व्हिडीओ शेअर करून व्यक्त केल्या वेदना | Celina Jaitly Video

सेलिनाने या व्हिडीओसोबत एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. पोस्टमध्ये तिनं नमूद केलंय की, गेल्या काही आठवड्यांचा काळ तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस ठरला आहे. अभिनेत्रीने म्हटले की, ती एक आई आहे आणि आता ती आपले दुःख लपवू शकत नाही. हा व्हिडीओ शेअर करणे सोपे नव्हते, पण जगाला आपले सत्य सांगायचे होते.

(नक्की वाचा : Trisha Krishnan Net Worth: थलापती विजयच्या यशानंतर त्रिशाची चर्चा; कोट्यवधी मालमत्तेची मालकीण असलेल्या या अभिनेत्रीची नेटवर्थ माहितीये?)

सेलिना जेटलीची पोस्ट व्हायरल

मुलांपासून दूर राहण्याचे दुःख

सेलिना जेटलीने पती पीटर हागवर गंभीर आरोप केले आहेत. सेलिनाने असा दावा केला की, तिला मुलांना भेटू दिले जात नाहीये. कोर्टाचे आदेश असूनही तिच्या मुलांपासून तिला दूर ठेवले गेले. ती फक्त तिचा मुलगा शमशेरलाच भेटू शकली, ज्याचा आता मृत्यू झाला आहे. एका आईसाठी आपल्या मुलांपासून दूर राहणे हे सर्वात मोठे दुःख असते. ती हार मानणार नाही आणि आपल्या मुलांसाठी लढत राहील, असेही तिनं म्हटलंय.

लग्नासाठी सोडले होते सर्वकाही

सेलिनाने तिच्या पोस्टमध्ये हे देखील सांगितले की, तिने लग्न आणि कुटुंबासाठी खूप काही गोष्टी सोडले होते. तिने तिचं करिअर, आपला देश आणि कुटुंबही मागे सोडले. पतीसोबत राहण्यासाठी ती भारतामधून दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रियापर्यंत गेली. पण या मोबदल्यात फक्त दुःख आणि त्रास मिळाला. मानसिक त्रासासह मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले, असा आरोप तिने केला आहे.

(नक्की वाचा : Mukesh Khanna Getting Married: 'फक्त पतिव्रता का? पत्नीव्रता का नाही?' मुकेश खन्नांचे अफेअर, गर्लफ्रेंड, लग्नावर रोखठोक विधान)

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सेलिना जेटलीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक लोक तिच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत आणि तिला धीर धरण्यास सांगत आहेत. सेलिनाने नोव्हेंबर 2025 मध्ये पती पीटर हागविरोधात घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com