Veteran Actor Ranjeet Daughter: बॉलिवूडमध्ये आजवर कित्येक स्टार किड्सने आपले नशीब आजमावले आहे. काही एका रात्रीतच स्टार झाले तर काहींना सिनेरसिकांना सपशेल नाकारले. पण काही असेही स्टार किड्स आहेत, ज्यांनी आपल्या आई किंवा वडिलांप्रमाणे या चंदेरी दुनियेचा मार्ग स्वीकारला नाही. तर त्यांनी अन्य क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे.
अशाच स्टार किड्सच्या यादीतील एक नाव म्हणजे दिव्यांका बेदी. दिव्यांका ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक गोपाल बेदी म्हणजेच रणजीत यांची मुलगी आहे. तिचा क्युट अवतार व ग्लॅमरस स्टाइल पाहून तुम्ही देखील दिव्यांकाच्या सौंदर्यावर नक्कीच फिदा व्हाल. दिव्यांकाची स्टाइल आणि लुक बॉलिवूड अभिनेंत्रीप्रमाणेच सुंदर आहे, पण तरीही तिने सिनसृष्टीपासून दूर राहण्याचे ठरवले. दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावून तिने स्वतंत्र ओळख निर्माण केली.
(Video : तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता... ऐश्वर्याच्या नात्याबाबत काय म्हणाला होता सलमान?)
दिव्यांका बेदी लाइमलाइटपासून दूर
दिव्यांका बेदीने ज्वेलरी आणि फॅशन क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. दिव्यांका बेदी उत्कृष्ट फॅशन डिझाइनर व ज्वेलरी डिझाइनर म्हणून प्रसिद्ध आहे. आपले डिझाइन्स ती सोशल मीडियावर देखील शेअर करते. याव्यतिरिक्त तिने सिनेसृष्टीतील अभिनेते - अभिनेत्रींसाठी देखील डिझाइनिंगचे काम केले आहे.
(एक दोन नव्हे तर मिथून चक्रवर्तीच्या 29 सिनेमे टॉकीजमध्ये झळकण्यापूर्वीच झाले आऊट!)
दिव्यांका आहे फिटनेस फ्रीक
आपला लुक सुंदर दिसावा व कायम मेंटन राहावा, यासाठी दिव्यांका बेदी बरीच मेहनत देखील घेत असते. दिव्यांकाचे इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटो-व्हिडीओ पाहून आपणास कळेल की ती फिटनेसची कशा पद्धतीने काळजी घेते. आपल्या वर्कआउट रुटीनमध्ये ती कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही. इतकेच नव्हे तर इतरांनाही वर्कआउट करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता दिव्यांका आपले वर्कआउट-फिटनेसचे फोटो-व्हिडीओ फॉलोअर्ससोबत शेअर करत असते.
(प्रकाश राज भाजपामध्ये प्रवेश करणार? 'सिंघम' अभिनेत्यानं सोशल मीडिया पोस्टला दिलं उत्तर)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world