जाहिरात

Beed News: रणजीत कासलेची कराड स्टाईल! 'मीच बळी जाणार' म्हणत पोलिसांना शरण येणार, नवा VIDEO

Beed Santosh Deshmukh Murder Case: या व्हिडिओमध्ये रणजीत कासले हा एका जंगलात असल्याचे दिसत असून मी ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा त्याने यामध्ये केला आहे. 

Beed News: रणजीत कासलेची कराड स्टाईल! 'मीच बळी जाणार' म्हणत पोलिसांना शरण येणार, नवा VIDEO

विनोद जिरे, बीड: सध्या बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रंजीत कासले हे त्यांच्या वादग्रस्त व्हायरल व्हिडिओवरून चर्चेत आहेत. वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती बोगस एन्काऊंटर साठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी बीडमधील एका वकिलाच्या फिर्यादीवरून कासले विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच कासले यांनी आणखी एक नवीन व्हिडिओ व्हायरल केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रणजीत कासले बीड पोलिसांसमोर सरेंडर होणार आहे. सरेंडरची माहिती ही रणजित कासलेनी नवा व्हिडिओ व्हायरल करून दिली आहे. या व्हिडिओमध्ये रणजीत कासले हा एका जंगलात असल्याचे दिसत असून मी ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा त्याने यामध्ये केला आहे. 

कासले हा बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. सायबर विभागाचे हात कुठपर्यंत असतात हे रणजीत कासलेला चांगलंच माहित आहे. त्यामुळं माझ्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सर्व प्रकरणात मीच बळी जाणार म्हणत मी बीड पोलिसांना सरेंडर होणार आहे, अशी माहिती दिली आहे.नेमकं कोणत्या पोलीस स्टेशनला सिलेंडर होणार हे मात्र निश्चित नाही, असंही त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

ट्रेंडिंग बातमी -  Crime News: बीडपेक्षा सिंधुदुर्ग भयानक? खून केला, मृतदेह जाळला, 2 वर्षानंतर पर्दाफाश झाला, बोट राणेंकडे?

दरम्यान, रणजीत कासले यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती होती. मार्च महिन्यात ते एक आरोपी आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यानंतर कोट्यवधी रूपयांची डील केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. याची तक्रार येताच पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याची चौकशी केली. त्यानंतर त्यांना निलंबित केले होते. तेव्हापासून ते सोशल मीडियावर सक्रिय होते. वेगवेगळ्या ठिकाणी जावून त्याने व्हिडीओ बनवत ठाणेदार ते अपर पोलिस महासंचालक आणि राजकीय नेत्यांवरही गंभीर आरोप केले होते. अनेक व्हिडीओमध्ये ते दारू पिल्याचीही कबुली देत होते. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पोटगी मागितली म्हणून पत्नीशी जबरदस्ती शरीरसंबंध, नंतर गुप्तांगात हळदी कुंकू लावलेले लिंबू पिळले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: