लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारे भाजपाचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना निलेश राणेंनी सेंट्रल हॉलमधून हाकलून लावलं, असा गौप्यस्फोट गोपीचंद पडाळकर यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीमधील सभेत ते बोलत होते. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यासह रणजित सिंह मोहिते पाटील यांनाही लक्ष्य केलं. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ही मागणी केली होती. त्या मुद्यावर बोलताना त्यांनी ही टीका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पडाळकर?
'रामभाऊंनी विषय मांडला रणजीत सिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यायला हवा. खरंच त्यांना लाज वाटत असेल ना... आपण ज्या देवाभाऊंच्यामुळे माणसात आहोत, जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला.
नितेश राणेंचं टाळ्या वाजवून अभिनंदन करा, एक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. परवा, देवाभाऊंची विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी, माझ्या बाजूला नितेश राणे आणि नितेश राणेंच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते. सेंट्रल हॉलला...
नितेश राणेंसाहेबांना ते दिसल्यावर म्हणाले तू कसा काय इथं आलास? खरी परिस्थिती सांगतोय, तुला काही लाज-लज्जा वाटत नाही का... नाही, नाही रामभाऊंनी आमच्या खानदानाची... अरे तुझं सगळं खानदान जेलमध्ये असतं. तू काय सांगतोस म्हणाले, देवाभाऊच्या विरोधात गेलास चल बाहेर, पहिला निघ. चार दिवसांपूर्वी, गेलं ते उठूनच गेलं. दादा याच्यापेक्षा काही सांगायला लागतंय का?
( नक्की वाचा : शरद पवारांनी लेकीचा आणि नातवाचा राजीनामा घ्यावा, मारकडवाडीमध्ये गोपीचंद पडाळकरांचं थेट चॅलेंज )
सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल, मला माहिती नाही तिथं कॅमेरा आहे की नाही, पण तिथं ते झाडलं. बाकीचे आमदारही इकडं-तिकडं कावरे-बावरे बघायला लागले. वाघाच्या पोटी वाघ जन्माला येतो तसे ते (निलेश राणे) आहेत.
प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे, त्यांच्या छातावरती तुम्ही-आम्ही सर्वांनी नाचायला हवं. माझी भाजपाला विनंती आहे. ज्यांनी 2024 मध्ये पडत्या काळात गद्दारी केली आहे, त्यांना पायताणाच्या जवळही ठेवू नका,' अशी मागणी पडाळकर यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world