
Actor Manoj Kumar Passes Away : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ते काही काळापासून आजारी होते. या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत 'भारत कुमार' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास #ManojKumar #NDTVMarathi pic.twitter.com/2mtcZG2bUK
— NDTV Marathi (@NDTVMarathi) April 4, 2025
मनोज कुमार यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत बहुतेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत. म्हणूनच त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने 'भारत कुमार' म्हणत. त्यांचे क्रांती आणि उपकार सारखे चित्रपट खूप प्रसिद्ध झाले.
भारतीय चित्रपट आणि कलां क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1964 साली त्यांनी 'वो कौन थी?' या सिनेमात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली मध्ये होती. तो सुपरहिट ठरला. या चित्रपटातील 'लग जा गले' आणि 'नैना बरसे रिमझिम' ही गाणी लोकांना खूप आवडली, ज्यांना लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world