
अभिषेक बच्चन सध्या फार सिनेमांमध्ये दिसत नाही. मात्र या ना त्या कारणाने तो लाईम लाईटमध्ये असतो. प्रो कबड्डी, क्रिकेट, पार्टीज् अशा अनेक ठिकाणी अभिषेक बच्चन स्पॉट होतो. भारत-इंग्लंड सामन्यानंतरचा अभिषेक बच्चनचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनसोबत अशी घटना घडली ज्यामुळे त्याचे चाहते काळजीत होते. अलीकडेच अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन एका कॅफेमधून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. पण अचानक कोणीतरी मागून कॅफेचे शटर बंद केले. अभिषेक बच्चन उंच असल्याने, शटर त्याच्या डोक्यावर आदळतं.
(नक्की वाचा- Elephant vs JCB : हत्ती आणि जेसीबी समोरासमोर; कोण जिंकलं? पाहा VIDEO)
मात्र अभिषेक बच्चनच्या डोक्याला फार इजा झाली नाही. अभिषेक बच्चन हसत मुखाने बाहेर पडताना दिसला. जाता जाता अभिषेक भेटतो आणि गाडीत बसून निघून जातो. मात्र शटर जोरदार आदळल्याने अभिषेकच्या डोक्यांना मार लागला असेल.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन भारत आणि इंग्लंडमधील टी-20 सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर आले होते. सामन्याचा आनंद घेतल्यानंतर, दोखेही जुन्या उडुपी शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथे दोघांनीही अेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आणि शेवटी कॉफी प्यायली. बिग बी आणि अभिषेक यांचा कॅफेमध्ये जाण्याचा एक व्हिडिओ देखील ऑनलाइन समोर आला आहे. या कॅफेमधून बाहेर पडताना अभिषेक बच्चनसोबत ही घटना घडली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world