
गोविंदाच्या 37 वर्षांच्या सुखी संसारात सारं काही सुरळीत नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. गोविंदा आणि पत्नी यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही बोललं जात आहे. आता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे अशी देखील चर्चा आहे. दोघांनीही आपले वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुनीताने मागील काही मुलाखतींमध्ये सांगितले होते की, गोविंदा तिच्यासोबत राहत नाही. त्यांच्या अफेअरबद्दलही तिने गंमतीने सांगितले होते. गोविंदा आणि सुनीता यांच्या विभक्त होण्यामागे 30 वर्षीय मराठी अभिनेत्री असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, याबाबत गोविंदा किंवा सुनीता यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
(नक्की वाचा- Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं नृत्य नको, त्र्यंबकेश्वर संस्थानच्या कार्यक्रमावर आक्षेप; काय आहे प्रकरण?)
गोविंदाची पत्नी सुनीता तिच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी गोविंदावर गोळी झाडली गेली होती, तेव्हा तो सुनीतासोबत राहत नसल्याचे समोर आले होते. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. गोविंदा आणि सुनीता यांनी 11 मार्च 1987 रोजी लग्न केले होते. दोघांना दोन मुले आहेत. सुनीता सध्या तिचा मुलगा यशवर्धन आणि टीनासोबत राहते. गोविंदा त्यांच्यापासून वेगळा राहतो.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
व्हायरल पोस्ट
गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, Reddit वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे, "सुनीताने अलीकडील अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाचे अफेअर असल्याचे संकेत दिले आहेत. तो तिच्या फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. कारण दोघांचे शेड्युल जुळत नाही. ज्या व्यक्तीच्या अनेक गोष्टी तुम्ही माफ केल्या त्याच्यासोबत राहणे किती तडजोड असते. आई आणि संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली आणि त्याने वृद्धापकाळात सोडले."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world