जाहिरात
Story ProgressBack

दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरु झालं होतं सलमानच्या अभिनेत्रीचं करिअर, पहिल्याच ब्लॉकब्लास्टनंतर पडली मागं!

Read Time: 3 min
दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरु झालं होतं सलमानच्या अभिनेत्रीचं करिअर,  पहिल्याच ब्लॉकब्लास्टनंतर पडली मागं!
प्रातिनिधीक फोटो
मुंबई:

दूरदर्शनवर प्रसारीत झालेल्या एखाद्या मालिकेत झळकल्यानंतर सिनेमाची ऑफर येणे हे काही मोजक्याच कलाकरांबरोबर घडले आहे. काही कलाकारांना दुरदर्शनवरून मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. त्यानंतर या कलाकारांनी कधीही मागे वळून पाहिले नाही त्यापैकी एक नाव म्हणजे शाहरूख खान. परंतु काही असेही कलाकार आहेत ज्यांना मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी ऑफर आली खरी पण त्यांना त्या संधीचे सोने करता आले नाही. आज आपण ज्या अभिनेत्रीसंदर्भात बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नशीब देखील असेच आहे. या अभिनेत्रीला छोट्या पडद्यावर खूप प्रेम मिळाले. इतकेच नव्हे तर पहिल्याच चित्रपटात त्या अभिनेत्रीला मोठी प्रसिध्दी, पैसे आणि ग्लॅमर  मिळालं. परंतु त्यानंतर ती सिनेमात फारशी दिसली नाही. आपण ज्या अभिनेत्री संदर्भात बोलत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव भाग्यश्री पटवर्धन आहे. भाग्यश्रीने करियरची सुरूवात दुरदर्शनच्या एका मालिकेतून केली होती. ही मालिका कोणती हे माहित आहे का ? 

भाग्यश्रीने तिच्या करियरची सुरूवात एका दुरदर्शनवरील मालिकेतून केली होती. ही मालिका यशाच्या शिखरावर पोहचली.  त्यात तीने साकरालेल्या व्यक्तीरेखेची चांगलीच चर्चा रंगली आणि त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर झळकली. हा चित्रपट तर सुपरडुपर हिट झाला. मात्र ज्या मालिकेमुळे ती प्रसिध्दी झोतात आली ती दुरदर्शनवरील मालिका आजही लोकांच्या आठवणीत आहे. त्या दशकात मनोरंजनासाठी दुरदर्शनवरील मालिका हमखास पाहिल्या जात. त्यावेळी तीन बहिणींची गोष्ट सांगणारी ही मालिका 1987 मध्ये  प्रसारीत झाली होती. 

 '

कच्ची धूप' असं या मालिकेचं नाव होतं. या मालिकेत भाग्यश्रीने अलका नावाच्या तरूण मुलीची व्यक्तीरेखा साकराली होती. ही व्यक्तीरेखा मोठ्या बहिणीची होती. या मालिकेत असणा-या तिच्या भूमिकेत ती खूप सुंदर दिसायची. तिच्या चेह-यावर असलेला निरागसपणा आणि साधेपणाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. लगान, स्वदेस या सुपरहिट सिनेमांमुळे नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेले आशुतोष गोवारीकर या सिनेमाचे दिग्दर्शक होते.

ही त्यांची देखील पहिलीची मालिका होती. ते देखील भाग्यश्रीचे काम उत्तम असल्याने नेहमीच तिचे नेहमीच कौतुक करत असे. या मालिकेनंतर भाग्यश्रीला मैने प्यार किया या सिनेमात सलमान खान बरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले. मात्र त्यानंतर ती मागं पडली. 

'कच्ची धूप' मध्ये तीन बहिणी आणि त्यांच्या आईची कहाणी दाखवली होती. ज्या बहिणी आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कष्ट करत आहेत. मात्र त्यातही त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करून त्या बहिणी एकत्र येऊन अडचणींचा डोंगर पार पाडतात अशा अशयाची कहाणी मालिकेत दाखवली होती. या मालिकेची गोष्ट ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी लिहली होती. या मालिकेचे केवळ 14 भाग प्रसारित झाले होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination