जाहिरात

Deepika Padukone: मुलगी झाली हो! दीपिका पादुकोण-रणवीर सिंहच्या घरी आली परी

Deepika Padukone Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) मुलीला जन्म दिला आहे.

Deepika Padukone: मुलगी झाली हो! दीपिका पादुकोण-रणवीर सिंहच्या घरी आली परी

Deepika Padukone Ranveer Singh : बॉलिवूडमधील स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झालेले आहे. IANSने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका पादुकोणने मुलीला जन्म दिला आहे.  शनिवारी (7 सप्टेंबर) तिला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही बातमी समोर येताच दीपिका-रणवीरचे चाहत्यांमध्ये बाळाच्या जन्माच्या गुड न्यूजसंदर्भात उत्सुकता निर्माण झाली. चाहत्यांनी दीपिकासाठी काळजी व्यक्त करून प्रार्थना देखील केली. गिरगावातील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दीपिकाला दाखल करण्यात आले होते. यादरम्यान दीपिकाने रविवारी (8 सप्टेंबर) मुलीला जन्म दिल्याचे वृत्त समोर आले.  

डिलिव्हरीपूर्वी श्री सिद्धिविनायकचे घेतले होते दर्शन

दीपिका पादुकोणने बाळाला जन्म देण्यापूर्वी शुक्रवारी (6 सप्टेंबर) पती रणवीर सिंहसोबत मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. बाप्पाचे दर्शन घेऊन या दाम्पत्याने त्यांच्या कुटुंबीयांसह देवाचा आशीर्वाद घेतला. 

(नक्की वाचा: दीपिका पादुकोण जुळ्या बाळांना देणार जन्म? मॅटर्निटी फोटोशूटनंतर चर्चा)

नुकतेच केले होते मॅटर्निटी शूट 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने 2 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. या दोघांचेही फोटो प्रचंड सुंदर आणि हटके स्वरुपातील होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दोघांमधील केमिस्ट्रीचे कौतुक करत चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही फोटोवर लाइक आणि कमेंट्स पाऊस पाडला. 

वर्ष 2018मध्ये रणवीर आणि दीपिका पादुकोणने मोठ्या थाटामाटात लग्न केले आणि आता सहा वर्षांनंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला.  

Like and subscribe Movie: अमेय वाघसोबत गौतमी पाटील थिरकणार आणि संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार

(नक्की वाचा: Like and subscribe Movie: अमेय वाघसोबत गौतमी पाटील थिरकणार आणि संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार)

दरम्यान दीपिका आणि रणवीर सिंहने 29 फेब्रुवारी 2024ला तिच्या प्रेग्नेन्सीबाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो पोस्ट करत तिने गुडन्यूज आपल्या चाहत्यांना सांगितली होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com