Dharmendra Health News : चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती (Dharmendra's health deteriorates) समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांच्यावर बरेच दिवस उपचार सुरू होते. यानंतर १२ नोव्हेंबरला त्यांना घरी आणण्यात आलं होतं. त्यानंतर आज २४ नोव्हेंबर म्हणजे १२ दिवसांनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात आहे. धर्मेंद्र यांच्या घराबाहेर रुग्णवाहिका पोहोचली आहे. त्यांच्या घराबाहेर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. धर्मेंद्र यांच्या तिन्ही मुली वडिलांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत.
३१ ऑक्टोबरला मुंबईच्या रुग्णालयात झाले होते दाखल...
सुपरस्टार धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर १२ नोव्हेंबरच्या सकाळी त्यांना डिस्जार्ज देण्यात आला होता. धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी उपचार सुरू होते.
सहा दशके सिनेविश्व गाजवले! धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील नसराली येथे झाला आणि 1958 मध्ये फिल्मफेअर टॅलेंट हंट जिंकल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1960 आणि 1970 च्या दशकात ते रोमँटिक आणि अॅक्शन हिरो म्हणून एक मोठे स्टार बनले आणि नंतर त्यांना बॉलीवूडचा महानायक म्हणून ओळखले जाऊ लागले. धर्मेंद्र यांनी सहा दशके हिंदी सिनेविश्वावर राज्य केले. 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. सुरुवातीच्या काळात 'अनपढ़', 'बंदिनी', 'अनुपमा' आणि 'आया सावन झूम के' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर त्यांनी शोले, चुपके, चुपके सत्यकाम, सीता और गीता, यमला पगला दिवाना, अपने तो अपने होते है सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world